शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी जळगावात डॉ.निलेश किनगे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:30 IST

अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणलेल्या निवृत्ती सुपडू पाटील (वय ३२ रा.कळमसरे, ता.पाचोरा) या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलचे डॉ.निलेश किनगे यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा केल्याचा (कलम ३०४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे उपचारात हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा ठपकाडॉक्टर नसतानाही दाखल केले अतिदक्षता विभागात कलम ३०४ अ गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २८ : अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणलेल्या निवृत्ती सुपडू पाटील (वय ३२ रा.कळमसरे, ता.पाचोरा) या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलचे डॉ.निलेश किनगे यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा केल्याचा (कलम ३०४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  काय आहे प्रकरणनिवृत्ती पाटील या तरुणाचा आठ दिवसापूर्वी कुºहा-जामनेर रस्त्यावर अपघात झाला होता. दुचाकीवरुन घसल्याने डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्याला पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी निवृत्ती याची त्या दवाखान्यातून सुटका झाली. डोक्याला मार लागल्याने जळगावात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेऊ म्हणून नातेवाईकांनी निवृत्ती याला मंगळवारी सायंकाळी महामार्गाला लागून असलेल्या डॉ.निलेश किनगे यांच्या अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी निवृत्तीला अतिदक्षता विभागात ठेवण्याचा सल्ला दिला. मेंदूला सूज असल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल व त्यासाठी दिड लाख रुपयांचा खर्च लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. तत्पूर्वी एका खासगी दवाखान्यातून सीटी स्कॅनही करण्यात आले होते.त्यानुसार निवृत्ती पाटील या तरुणावर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेसाठी नातेवाईकांनी दीड लाख रुपयेही आणले, मात्र डॉक्टर निलेश किनगे हे बाहेरगावी निघून गेले व त्या काळात रुग्णाचा मृत्यू झाला.