शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामकाजास टाळाटाळ करणा-या जळगावातील ६९ बीएलओंविरुध्द गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 12:12 IST

निवडणुकीच्या कामकाजास टाळाटाळ करणा-या जळगाव तालुक्यातील ६९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याविरुध्द मंगळवारी मध्यरात्री साडे बारा वाजता शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले. तहसीलदार अमोल निकम यांनी स्वत:च फिर्याद दिली.

ठळक मुद्देतहसीलदारांनी मध्यरात्री दिली फिर्यादशहरातील ६२ तर ग्रामीणच्या ७ बीएलओंचा समावेशयापूर्वी धरणगाव तालुक्यातही दाखल झाले गुन्हे

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९ : निवडणुकीच्या कामकाजास टाळाटाळ करणा-या जळगाव तालुक्यातील ६९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याविरुध्द मंगळवारी मध्यरात्री साडे बारा वाजता शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले. तहसीलदार अमोल निकम यांनी स्वत:च फिर्याद दिली. मतदार यादीतचे विशेष संक्षिप्त पुन:निरीक्षण या कार्यक्रमातंर्गत १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी बीएलओ यांना बंधनकारक होती, मात्र या प्रक्रीयेत त्यांनी जबाबदारी पार न पाडता टाळाटाळ केल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी अशा बीएलओंविरुध्द कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते.

जळगाव तालुक्यातील ५६० बीएओ यांनी कामकाज करणे बंधनकारक असताना ६९ अधिका-यांनी आपली जबाबदारी टाळल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी मंगळवारी या बीएलओंविरुध्द शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. काही दिवसांपूर्वी धरणगाव तालुक्यातीलही बीएलओंविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. आता जळगाव तालुक्यातील बीएलओंविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

गुन्हे दाखल झालेले बीएलओ पुढील प्रमाणे मो.जहीर अ. कदीर , रमेश राजाराम पाटील , सुनील हरी बाविस्कर , किरण शिवदास बाविस्कर , अशोक लोटू बोरोले , वेदप्रकाश श्रीराम गडदे , राजेंद्र सावळेराम दिवे , योगेश सुपडू भालेराव , नरेंद्र बापुराव पालवे, आर.पी.पवार , वाय.पी.पाटील, राजेंद्र चिमणराव देशमुख ,सिध्दार्थ चिंधू भालेराव , नितीन सुधाकर चौक , संदीप कुमार बांगर , नितीन विक्रम सोनवणे, भगवान तापीराम पारी, ए.पी.सोनवणे, अनिल दादाभाऊ शितोळे , विलास भाऊराव पाटील ,मोतीराम सोमा भोये , प्रमोद पी.पाटील, विनोद सुधारक भोलाणे, बापू नाना पाटील , साहेबराव फकीरा बागुल , अ.वादीद इमाम अन्सारी , गोविंद श्रीकृष्ण चौधरी , गजानन पांडूरंग वाणी , शुभम रमेश गजभिये , राजेंद्रसिंग शिवाजी पाटील , राजकुमार कोटूमल नागराणी, मनोज देवचंद सोनार, राजेंद्र विठ्ठल उमाळे, निळकंठ खडके, किरण भास्कर भोळे, कैलास चिंतामण सोनार, मो.अयुब मो.युसुफ, प्रमोद नरसिंगराव सुर्वे, अजय एस.ब-हाटे, शालिक चिंधू तायडे, एस.बी.धबाळे, एस.व्ही.जंगले, राहूल शिवाजी पवार, एम.पी.भदाणे, चेतन अशोक सोनवणे, मनोहर भजनलाल तेजवाणी, महेंद्र आत्माराम बेलदार, लक्ष्मण मोतीराम पाटील, संदीप विकास भावसार, अरुण नामदेव वाणी, आसीफ जब्बार फारुखी, पी.एस.जाधव, राजेंद्र देवराम कोळी, नितीन सुरेश चौधरी, जावेद जहीर खान तडवी, गणेश पंढरीनाथ वानखेडे, किशोर लक्ष्मण अटवाल, पंडित कोडाजी पवार, शशिकांत लक्ष्मण भामरे, शिवाजी भाऊलाल पाटील, नारायण ओंकार सपकाळे, सतीश नामदेव घुगे , कैलास भरत पाटील, चंद्रकांत पंढरी पाटील, संदीप त्र्यंबक रोकडे, शेख मुस्तफा खलील, जी.डी.काळे, परमार रहीम तडवी, मनिष रामदास पाटील यांच्याविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम ३२ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.