शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्स कर्मचा:याला भर दिवसा लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 12:01 IST

वराड-वडली रस्त्यावरील घटना

ठळक मुद्देदीड लाखाचा ऐवज घेऊन पोबारादुचाकीवरुन आले तीन चोरटे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10 - बळीराम पेठेतील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीच्या कृषी बचत गटाचे हप्ते वसूल करुन येणा:या विजय धनराज बारी (वय 22 रा.जुना खेडी रोड, जळगाव) या कर्मचा:याला दुचाकीवरुन आलेल्या तीन जणांनी बेदम मारहाण करुन त्यांच्याजवळील 1 लाख 14 हजाराच्या रोकडसह लॅपटॉप व अन्य साहित्य असा 1 लाख 46 हजार 330 रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना सोमवारी भरदिवसा दुपारी एक वाजता तालुक्यातील वराड-वडली रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय बारी हे कृषी बचत गटाचे हप्ते घेण्यासाठी सोमवारी वराड, सुभाषवाडी, लोणवाडी व वडली परिसरात गेलेले होते. लोणवाडी तांडा येथून सुनिता राठोड यांच्यागटाकडून 21 हजार 300 रुपये, राखीबाई गोविंदा धाडी यांच्यागटाकडून 19 हजार 170, लालचंद चव्हाण यांच्याकडून 21 हजार 200, धारा राठोड यांच्या गटाकडून 19 हजार 80, गणेश तवर गटातील दिलीप चव्हाण यांच्याकडून 14 हजार 990 असे एकुण 95 हजार 660 रुपये घेतले. तर आधीचे 19 हजार 170 रुपये जवळ होते. ही सर्व रक्कम घेऊन लोणवाडी तांडा येथून वराडमार्गे वडली येथे जात असताना 12.45 वाजता वडली शिवारातील शेषराव रामकृष्ण पाटील यांच्या शेताजवळ मागून दुचाकीवरुन आलेली तिघांनी समोर दुचाकी आडवी लावून मारहाण करुन दीड लाखाचा ऐवज लुटून नेला.हा प्रकार घडल्यानंतर बारी यांनी वडली येथील पोलीस पाटील दिलीप पाटील व गावक:यांना माहिती दिली. त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील             कुराडे व म्हसावद दूरक्षेत्राचे एन.बी.सूर्यवंशी यांना घटनेची माहिती कळवली. त्यानंतर सायंकाळी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.एकाने चावी काढली तर दुस:याने कानात मारलीदुचाकीवरील तिघांनी बारी यांना थांबवून एकाने दुचाकीची चावी काढली तर दुस:याने कानशिलात लगावली. काही समजण्याच्या आत तिस:याने पाठीला लावलेली बॅग काढली तेथून पोबारा केला. या बॅगेत 1 लाख 14 हजार 830 रुपये रोख, 20 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, 10 हजार रुपये किमतीचे ग्राहकांना पावती देण्याचे मशीन, दीड हजार रुपये किमतीचे डोंगल असा 1 लाख 46 हजार 330 रुपयांचा ऐवज लुटून नेला.