शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

अखेर नशिराबाद ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST

नशिराबाद : येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अर्जाचा माफीनामा सादर केला. गावातील नागरिकांनी ...

नशिराबाद : येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अर्जाचा माफीनामा सादर केला. गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांबाबत षड्‌यंत्र रचून त्यांच्या विरोधात निवेदन सादर करून घेतले, असा धक्कादायक खुलासा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या माफीनाम्यात केला आहे.

ग्रामपंचायतमधील अस्थायी कर्मचारी पूनम मर्दाने, राकेश मर्दाने, विजय जाधव हे तिघे जण काम करीत होते. दिवाळीदरम्यान ग्रामविकास अधिकाऱ्यांना पगाराची मागणी केली. पगार बँकेच्या खात्यात जमा होईल, असे त्यांनी सांगितले होते; मात्र ग्रामपंचायत कार्यालयात वाद घालून पगाराची मागणी करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता.

याविषयी आता कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी अस्थायी कर्मचारी असल्याने आम्हा तिघांना काही दिवस कामावरून काढण्याचा निर्णय घेतला होता. याचा राग मनात ठेवून द्वेष बुद्धीने गावातील दोन-तीन नागरिकांच्या म्हणण्यावरून गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात जिल्हा परिषदेकडे निवेदने सादर केली व त्यांना निलंबित करून आम्हाला कामावर रुजू करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती. सर्व कृत्य आम्ही तिघांनी अनवधानाने व एक-दोन जणांच्या सांगण्यावरून व ग्रामपंचायतमध्ये सुरळीत चाललेल्या कामकाजाला अडथळा निर्माण होण्याच्या उद्देशाने केले व बी.एस.पाटील यांच्याविरोधात गावात सुरू असलेल्या षड्‌यंत्रास पुष्टी मिळण्यासाठी आम्हाला त्यांच्या विरोधात अर्ज देण्यास प्रवृत्त केले, असा धक्कादायक खुलासा निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केला आहे. आम्ही केलेल्या खोट्या आरोपांबाबत माघार घेऊन त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार व द्वेष नसल्याचा खुलासा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यामुळे गावात सुरू असलेल्या राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकाराबद्दल गावात चर्चांना उधाण आले आहे.