शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मेहरुण तलावावर गाण्यांचे चित्रीकरण भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी शहरात कडक निर्बंध असतांनाही मेहरुण तलावावर गाण्याचे चित्रीकरण करणे तरुणांना चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी ...

जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी शहरात कडक निर्बंध असतांनाही मेहरुण तलावावर गाण्याचे चित्रीकरण करणे तरुणांना चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी सोमवारी दुपारी चित्रीकरण थांबून कॅमेरे वाहने जप्त केली. त्याशिवाय दहा जणांवर गुन्हा दाखल केला.

शहरातील मेहरुण तलाव परिसरात काही तरुण एकत्र जमून चित्रीकरण करत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी मिळाली. त्यानुसार चिंथा यांनी थेट मेहरुण तलाव गाठून एमआयडीसी पोलिसांना पाचारण केले. याठिकाणी चित्रीकरण करणाऱ्या वृषाल नितीन राठोड (वय २० रा. सुप्रिम कॉलनी), मनोज भिका जाधव (वय २० रा.वराड ता. जळगाव), सुरज रंजे सोनार (वय १९ रा. रामेश्‍वर कॉलनी), अभिजित रमेश चव्हाण (वय २५ रा. सुप्रिम कॉलनी), आनंद उर्फ गणेश सोमनाथ भोई वय (२१ रा. जुने गाव), सचिन चंद्रकांत भिरुड (वय २३ रा. पिंप्राळा जळगाव), गोपाल जगदीश राठोड (वय १९), ईश्‍वर रोहिदास राठोड (वय २२ दोन्ही रा. वराड ता.जळगाव), रिना यशवंत जाधव (वय २०, रा. शिवकॉलनी), अंकिता शरद बोदडे (वय २० रा. जामनेर) यांना ताब्यात घेत कारवाई केली. कारवाईत एक लाखांचा कॅमेरा तसेच दहा दुचाकी असा ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरुन तरुण अशा दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.