शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव एस.टी.बस धडकली रिक्षावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 21:35 IST

एस.टी.बस व रिक्षा यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन त्यात लक्ष्मण कैलास सोनवणे (वय २७,रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा रिक्षा चालक गंभीर झाला तर दुसरा कैलास भागवत नन्नवरे (वय ३७,रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा तरुण किरकोळ जखमी झाला.

ठळक मुद्देबांभोरी गावाजवळ अपघात दोन जखमी; रिक्षा चालक गंभीररिक्षात अडकला चालक

आॅनलाईन लोकमत,

जळगाव, दि.२९- एस.टी.बस व रिक्षा यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन त्यात लक्ष्मण कैलास सोनवणे (वय २७,रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा रिक्षा चालक गंभीर झाला तर दुसरा कैलास भागवत नन्नवरे (वय ३७,रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा तरुण किरकोळ जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजता महामार्गावर बांभोरी बस गावाजवळ झाला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लक्ष्मण सोनवणे व कैलास नन्नवरे हे दोन्ही जण रिक्षाने (क्र.एम.एच.१९ व्ही.५४७४) पाळधी येथून बांभोरी येथे येत होते तर शिरपुर आगाराची जळगाव-शिरपुर ही एस.टी.बस (क्र.एम.एच.२० बी.एल.०६९९) पाळधीकडे जात असताना महामार्गावर बांभोरी येथे विद्यापीठाकडे जाणाºया रस्त्याजवळ रिक्षावर धडकली.त्यात रिक्षातील दोघं जण जखमी झाले.

 रिक्षात अडकला चालकहा अपघात इतका भयानक होता की बसच्या धडकेने रिक्षाचा दर्शनीभाग अक्षरश: चक्काचूर झाला तर त्यात चालक लक्ष्मण हा अडकला होता. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कैलास हा मागे बसल्यामुळे त्याला लागलीच काढणे शक्य झाले तर लक्ष्मण हा रिक्षाच्या टपात व स्टेअरींगमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढायला कसरत करावी लागली. दोन्ही जखमींना तातडीने दुसºया रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पाळधी दूरक्षेत्राचे सहायक निरीक्षक विजय देशमुख व सहकाºयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.

बस चालकाने काढला पळअपघाताची भीषणता व घटनास्थळावर रक्ताचा सडा पाहून बस चालकाने तेथून बससह पळ काढला, तो थेट पाळधी पोलिसात हजर झाला. चालक प्रेमसिंग पुना गिरासे (रा.दहिवद, ता.शिरपुर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बस चालक घटनास्थळावरुन पळाला नसता तर गावकºयांनी त्याला झोडपून काढले असते अशी स्थिती होती. जिल्हा रुग्णालयातही नागरिक संतप्त झाले होते. चालकाला हलविले खासगीजखमी लक्ष्मणची स्थिती पाहता त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. कैलास याला सुरुवातीलाच खासगी दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली होती. लक्ष्मणच्या आईचा प्रचंड आक्रोश सुरु होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.