सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून सहायक फौजदार संगीता खांडरे या ड्युटीला असतानास सिंकदर खान व शोभा पवार या तक्रार देण्यासाठी आल्या व ठाणे अंमलदाराजवळ गेंदालाल मीलमधील नाजीमखा कदरखा पटवे, रिजवानाबी शेख आमीर,आबेदाबी व फरीदाबी जुबेर यांनी मागील भांडणाच्या कारणावरून आम्हाला मारहाण केली, अशी तक्रार नोंदवत असतानाच हे चौघे तेथे आले व आरडाओरड करून त्यापैकी नाजीमखा पटवे, फरीदाबी जुबेरखान यांनी सिकंदर व शोभा यांना मारहाण करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळ निर्माण झाला. तेव्हा उपनिरीक्षक अरुण सोनार, ठाणे अमलदार संगीता खांडरे, भूषण पाटील, संगीता इंगळे व मनीषा चव्हाण यांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांचा वाद मिटविला. पोलीस ठाण्यातच झोंबाझोंबी केली म्हणून भूषण पाटील या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस ठाण्यातच तक्रारदारांमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST