स्टार डमी : ८१८
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात दुसऱ्या लाटेत कोणताही आजार नसलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. एकत्रित परिस्थिती बघितली असता जिल्ह्यातील एकूण मृत्यूंपैकी ५० टक्के रुग्णांना इतर आजार होते तर ५० टक्के रुग्णांना कोणतेही आजार नव्हते. जिल्ह्यातील २,५६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकत्रित मृत्यूचे डेट ऑडिट केल्यानंतर प्रशासकीय अहवालात ही माहिती समोर येत आहे.
जिल्ह्यात मार्च २०२० पासून पहिली लाट आल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत ही लाट होती. त्यानंतर रुग्णसंख्या व मृत्यू संख्याही घटली होती. मात्र १५ फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्या व मृत्यूसंख्याही वाढली. मार्च व एप्रिलमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या व मृत्यूसंख्या होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक रुग्ण व मृत्यू या तीन महिन्यांत नोंदविण्यात आले. मात्र गेल्या १७ दिवसांचा विचार केल्यास मृत्यूची संख्या घटली आहे. तर गेल्या आठवडाभरात ८ मृत्यूची नोंद आहे जी दोन महिन्यांपूर्वी १०० पर्यंत होती.
दुसऱ्या लाटेत कमी वयाचे मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी वयाचे अधिक मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. यात ५ दिवसांच्या बालकाचाही समावेश आहे. यासह ३० ते ४० या वयोगटात पहिल्या लाटेपक्षा दुसऱ्या लाटेत अधिक मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.
शुगरचे अधिक रुग्ण
जीएमसीत झालेल्या डेथ ऑडिटनुसार मधुमेहाच्या सर्वाधिक ५४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडणी विकार अशा रुग्णांचा समावेश आहे.
वयोगटानुसार मृत्यू
० ते १५ : ४
१६ ते ३० : २५
३१ ते ४५ : १६३
४६ ते ६० : ३६५
६१ ते ८० : ५५६
८१ वर्षांपुढील ७५
११३ मृत्यू २४ तासांच्या आत
जिल्ह्यात ११३ मृत्यू हे दुसऱ्या लाटेत २४ तासांच्या आत नोंदविण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल केल्याच्या २४ तासांच्या आत या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १२४ रुग्णांचा मृत्यू हा तीन दिवसांच्या आत झाला आहे.