शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ‘मैत्रेय’च्या अडीच हजार गुंतवणूकदारांची साडे पाच कोटी रुपयात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:07 IST

‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कंपनीला कोणी कशी मदत केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्दे संचालक जनार्दन परुळेकर जळगाव पोलिसांच्या ताब्यातमुंबईत मिळणार गुंतवणूकदारांनी पैसे ‘मैत्रेय’च्या गुंतवणुकीचा शोध

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : ‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कंपनीला कोणी कशी मदत केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.दरम्यान, गजानन साहेबराव पाटील (वय ४१, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रेय’ कंपनीच्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. ‘मैत्रेय’च्या गुंतवणुकीचा शोधपरुळेकर हा परभणी पोलिसांच्या गुन्ह्यात कारागृहात होता.उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी व महेंद्र बागुल यांच्या पथकाने त्याला परभणी येथून ताब्यात घेतले. शनिवारी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी त्याला न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान, परुळेकर संचालक असल्याने त्याचा कंपनीत किती वाटा होता, कंपनीते जिल्ह्यात किती ठिकाणी व कोणत्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे, याची चौकशी केली जात आहे. संचालकांनी एजंटमार्फत पैसे वसूल केले आहेत व हे त्याची कुठे गुंतवणूक केली आहे याची चौकशी पोलीस करीत आहेत. मुंबईत मिळणार गुंतवणूकदारांना पैसे  फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील सर्व गुंतवणुकदारांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आपली रक्कम मिळणार आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रक्कम मिळणार नाही, फक्त ज्या गुंतवणुकदारांनी तक्रार केली नसेल त्यांची पॉलिसीची माहिती नमुन्यात भरली जाणार आहे व ही माहिती देखील मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडेच पाठविली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार हा मुंबईतच होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.