मोदलपाडा : अक्कलकुवा तालुक्यात शाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी पाचवीच्या हिंदी विषयाचे पुस्तक न मिळाल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शाळा सुरू होऊन तब्बल तीन महिने होऊनदेखील अक्कलकुवा तालुक्यात अद्यापर्पयत पाचवीची हिंदी, इतिहास, भूगोल तर सहावी, सातवी व आठवीची हिंदी विषयाची पुस्तके अद्यापर्पयत विद्याथ्र्यार्पयत पोहोचलेली नाहीत. तसेच सहावीच्या इंग्रजी विषयाची पुस्तके कमी मिळाली आहेत. राज्यात पहिली ते आठवीर्पयत सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळा व अनुदानित माध्यमिक शाळेत मोफत पुस्तक वाटप योजना राज्य शासनाने सुरू केली असून, पहिल्याच दिवशी सर्व विद्याथ्र्याना पुस्तके मिळावीत हा शासनाचा उद्देश काही ठिकाणी थोडा अयशस्वी ठरला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात 298 प्राथमिक शाळा असून, त्यापैकी 55 ठिकाणी पाचवीचे वर्ग आहेत. तर 15 अनुदानित माध्यमिक शाळा, 12 विनाअनुदानित शाळा, 17 शासकीय आश्रमशाळा, नऊ पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा व सात खाजगी प्राथमिक विनाअनुदानित मराठी शाळा सुरू आहेत. यापैकी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत व अनुदानित माध्यमिक विद्यालयात शासन स्तरावरून सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तकांचे वाटप अनेक वर्षापासून केले जाते. त्यामुळे गरीब कुटुंबातील विद्याथ्र्याना शिक्षणासाठी प्रेरणा मिळत असल्याने त्यांचा शैक्षणिक विकास होत आहे. मात्र या वर्षी शाळा सुरू होऊन तालुक्यात काही तांत्रिक अडचणींमुळे अद्यापर्पयत पाचवी ते आठवीर्पयतची हिंदीची पुस्तके मिळालेली नसल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या विद्याथ्र्याची राज्यभर पायाभूत चाचणी सुरू आहे. परंतु पुस्तकेच नसल्याने पालक व विद्यार्थी नाराजी व्यक्त करीत असल्याचे चित्र आहे. मात्र संबंधित पुस्तके बाजारात मिळत नसल्याने विद्याथ्र्याना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांना अध्यापनासाठी बाहेरून पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याचे समजते.
पाचवीचे हिंदीचे पुस्तक अद्यापही नाही
By admin | Updated: September 29, 2015 23:44 IST