शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तूर्त पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:16 IST

जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) व पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षा २३ मे रोजी आयोजित करण्‍यात आली होती. ...

जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) व पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षा २३ मे रोजी आयोजित करण्‍यात आली होती. मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, ही परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच परीक्षेची तारीख जाहीर करण्‍यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. त्यामुळे यंदा पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही हा संभ्रम निर्माण झाला होता. नंतर शिक्षण विभागाने पत्र काढत, शिष्यवृत्ती परीक्षा ही २५ एप्रिलला होणार असल्याबाबत स्पष्ट केले व २१ मार्चपर्यंत आवेदनपत्र भरण्‍यास मुदत देण्‍यात आली होती. मात्र, त्यानंतरसुद्धा परीक्षेच्या वेळापत्रकात शासनाकडून बदल करण्‍यात आला होता व परीक्षा २३ मे रोजी घेण्‍याचे निश्चित केले होते.

कोरोनाचा कहर, परीक्षा स्थगित...

आधीच परीक्षेला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्‍यात आला होता. १० एप्रिलपर्यंत शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता मुदतवाढ देण्‍यात आली होती. तसेच आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ही तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयाकडून कळविण्‍यात आले आहे.