शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

सरपंचांना 'वश' करण्यासाठी 'फिल्डिंग'ची चढाओढ..

By admin | Updated: September 12, 2014 15:01 IST

धुळे ग्रामीण मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी गावागावांतील सरपंचांपर्यंत घरपोच विविध कामांच्या मजुरीसह कार्यादेश पाठविण्याचा सपाटा लावला आहे.

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने 'जीआर' काढण्याचा सपाटा लावला असताना धुळे ग्रामीण मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी गावागावांतील सरपंचांपर्यंत घरपोच विविध कामांच्या मजुरीसह कार्यादेश पाठविण्याचा सपाटा लावला आहे. यात काँग्रेस आघाडी, शिवसेना, द. वा. पाटील गटात चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. 

निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हा लागू होते, याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. असे असताना इच्छुक उमेदवारांनी, त्यांच्या सर्मथकांनी हाती असलेल्या सत्तेच्या माध्यमातून आतापासून सरपंचांना 'वश' करण्याचा प्रयत्न चालविला आहे. घरपोच, ग्रामपंचायत कार्यालयात जलदगतीने निरनिराळ्य़ा कामांच्या मंजुरीसह कार्यादेश धडकत असल्याने सरपंच, ग्रामसेवकही आश्‍चर्यचकीत झाले आहेत. वित्त आयोग, ठक्कर बाप्पा योजनेसह निरनिराळ्य़ा कामांचा त्यात समावेश आहे.
सरपंचांवर वर्षाव
सरपंचांवर कार्यादेशांचा वर्षाव होत असल्याने तेही खुशीत आहेत. गटतट, पक्ष न पाहाता पाच वर्षातून एकदा असा भाव मिळत असल्याने सरपंचही मिळेल ती कामे करण्यासाठी उत्सुक दिसून येत आहेत. 
सत्तेचा उपयोग
काँग्रेस आघाडीकडे जिल्हा परिषदेची, द. वा. पाटील गटाकडे पंचायत समितीची आणि शिवसेनेकडे आमदारकीमुळे स्थानिक विकास निधी असल्याने त्याचा उपयोग सरपंचांना 'वश' करण्यासाठी केला जात आहे. कामे मंजुरी आणि कार्यादेशांचा कधी नव्हे तो वर्षाव सुरू झाल्याने सरपंचांनीही त्यात चिंब होण्याचा निर्णय घेतला आहे.
'एकते'चे दर्शन
एरवी राजकीय अहमहमिका असलेले नेते, इच्छुक उमेदवार कामे देताना मात्र 'एकते'चे दर्शन घडवित असल्याचे चित्र आहे. त्याचे ग्रामस्थांनाही अप्रूप वाटत आहे. सरपंचाकडे गावातील 'व्होट' बँक असल्याने त्यांची अशी काळजी घेण्याचा प्रयत्न 'एकते'तून होत आहे. हे प्रयत्न किती आणि कोणाला फलदायी ठरू शकतात हे आताच कुणालाही सांगता येणे अशक्य आहे. पण धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द. वा. पाटील गट आणि शिवसेनेत किती अटीतटीची व चुरशीची स्पर्धा सुरू आहे, याचा यातून अंदाज येऊ शकतो.या चारही घटकांच्या इच्छुकांसाठी, अंतिम उमेदवारासाठी ही प्रतिष्ठेची, वर्चस्वाची लढाई असेल. काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ पुन्हा या पक्षाकडे येतो की त्याच्या प्रयत्नांना शिवसेना, अपक्ष उमेदवार सुरूंग लावतो, हा उत्सुकतेचा भाग असेल.
 
■ निवडणूक सुरू होण्यापूर्वी धुळे मतदारसंघातील इच्छुकांनी प्रचारावर भर दिला असून कार्यकर्त्यांना जबाबदारीचे वाटपही केले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होते किंवा नाही, हा प्रश्न अनुत्तरीत असताना काँग्रेसच्या इच्छुकांनी या मतदारसंघात तयारीला वेग दिला आहे, तर राष्ट्रवादीच्या इच्छुकानेही 'हम किसी से कम नही', असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.