ऑनलाईन लोकमतकिनगाव, जि. जळगाव, दि. 3 - यावल तालुक्यातील किनगाव येथे वर्दळीच्या चौकातील बियाणे, खते विक्रीच्या दुकानात वाळू वाहतूक करणारे भरधाव ट्रॅक्टर शिरल्याने महिला गंभीर होवून चार दुचाकींचे नुकसान झाल़े शनिवारी सकाळी 10़30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली़ अपघातात ट्रॅक्टर चालक पसार झाल़ेमहेश गुरव यांच्या दुकानाजवळ चिंचखेडा येथील विमलबाई भील (वय 45) ही महिला बसली असतानाच विना क्रमांकाचे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर दुकानाच्या दर्शनी भागात धडकल्याने विमलबाई जखमी झाल्या़ त्यांना तातडीने गावातील उपआरोग्य केंद्रात जखमी अवस्थेत हलवण्यात आल़े त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून हलवण्यात आल़े या अपघातात विनय पाटील यांच्या मालकीच्या दुचाकीसह चार दुचाकींचे नुकसान झाल़े
किनगाव येथे भरधाव ट्रॅक्टर दुकानात शिरल्याने महिला गंभीर
By admin | Updated: June 3, 2017 12:52 IST