शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला अभियंत्यास मारहाण प्रकरणातील पती-पत्नीस अटक

By admin | Updated: February 20, 2017 01:34 IST

मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात : वीज चोरीच्या कारणावरून झाला होता वाद

धरणगाव/जळगाव : धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे वीज चोरीचा आकडा काढल्याचा राग येऊन महावितरणच्या महिला अभियंत्यास शिवीगाळ व मारहाण केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या अविनाश पांडुरंग चौधरी (वय 54) व वंदना अविनाश चौधरी (वय 48) दोन्ही रा.झुरखेडा या दाम्पत्याला स्थानिक गुन्हे शाखा व धरणगाव पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेऊन अटक केली.महावितरणच्या सोनवद कक्षाच्या अभियंता माधुरी पाटील व त्यांचे पथक थकीत वीज बिल वसुलीसाठी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता झुरखेडा येथे गेले असता अविनाश चौधरी यांनी महावितरणच्या लघु वाहिनीवर आकडा टाकून वीजपुरवठा घेतल्याचे लक्षात आल्यानंतर अभियंता माधुरी पाटील यांनी तो आकडा काढला. त्यावरून चौधरी दाम्पत्याने त्यांच्याशी वाद घातला होता. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांनी शिवीगाळ करून पाटील यांना मारहाण केली होती. या घटनेनंतर पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार चौधरी दाम्पत्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता.या घटनेनंतर चौधरी दाम्पत्य गावातून फरार झाले होते. आरोपीला अटक होत नसल्याने महावितरणमधील विविध संघटनांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले.  त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व  अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्वतंत्र पथक तयार केले होते. सहायक पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, उपनिरीक्षक सुखदेव भोरकडे, लालसिंग पाटील, मोती पवार, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, विद्या पाटील, मेजर कोळी यांच्या पथकाने जळगाव, औरंगाबाद, पुणे व मध्य प्रदेशात संशयितांचा शोध घेतला. आठ दिवसानंतर दोघंही खंडवा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने रविवारी तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले.