शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात कन्यारत्न प्राप्त मातापित्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 18:04 IST

शारदा गणेश मंडळाचा उपक्रम : मुलगी असण्याची खंत पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असल्याची मान्यवरांची भावना

ठळक मुद्देभुसावळातील शारदा गणेश मंडळातर्फे दोन कन्या असणा:या मातापित्यांचा सन्मानमान्यवर म्हणतात.. मुलगी असण्याची खंत पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते.ज्या दाम्पत्याला मुली आहेत त्याच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलविला पाहिजे.

ऑनलाईन लोकमत भुसावळ,दि.3 - शारदा नगरातील शारदा गणेश मंडळातर्फे फक्त दोन कन्या असणा:या मातापित्यांच्या रविवारी  सत्कार करण्यात आला. समाजाने ज्या दांम्पत्याला मुली आहेत त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलविला पाहिजे, असे आवाहन हभप लक्ष्मण महाराज यांनी येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. नारखेडे विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका रजनी इंगळे होत्या.  शारदा गणेश मंडळाने फक्त दोन कन्या प्राप्त दाम्पत्यांचा सत्कार करून समाजात आदर्श निर्माण केल्याची भावना मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. रजनी इंगळे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, मुलगी असण्याची खंत पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते. ही न्यूनगंडता महिलांनी कमी केली पाहिजे. मुलीलाच वंशाचा दिवा मानले पाहिजे. मुलीवर चांगले संस्कार करून चांगले शिक्षण द्या, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचलन व आभार वाय.एच.चौधरी यांनी केले. यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील, प्रशांत ढाके, पंकज ढाके, भूषण कोळंबे, मनोज फालक, राजू पटेल, नारायण झटके, विजय भारंबे, के.यू. पाटील, आर.के. चौधरी, जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. 

या दाम्पत्यांचा झाला सत्कारसत्कारार्थी पालक - वैशाली दिनेश पाटील, ज्योती नारायण वरंजानी, जयश्री गणेश सपकाळे, योगिता प्रमोद चौधरी, भारती धीरज नेहते, शोभा योगेश शर्मा, योगिता राहूल पाटील, मनीषा राजू पटेल, रूपा दीपक अग्रवाल, शिल्पा अजय केदारे, भारती अमोल नेहेते, संगीता सचिन पाटील, सोनाली प्रशांत कुलकर्णी यांचा सत्कार हभप लक्ष्मण महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.