शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वाकडी गावामध्ये असुरक्षीततेची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:16 IST

मुलांची नग्न धिंड काढण्याच्या घटनेनंतर पुन्हा भीतीचे वातावरण

जामनेर : वाकडी, ता.जामनेर येथे आठ महिन्यांपूर्वी विहिरीत मागासवर्गीय मुलांनी आंघोळ केल्यानंतर त्यांची गावात नग्न धिंड काढून अमानुष मारहाण केल्याची अमानवीय घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. अशातच याच गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या मातंग समाजातील विनोद चांदणे या तरुणाचा निर्घूण खून झाल्याने समाज बांधवांमध्ये असुरक्षीतचेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील दहशतीकडे कोणी लक्ष देईल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.वाकडी ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे लक्ष ठेऊन असणाऱ्या विनोद चांदणे यांनी गैरव्ययहार उघडकीस आणले व चौकशीची मागणी केल्याने याचा राग ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता, असे सांगण्यात येत आहे. याच रागातून चांदणे यांच्यावर सहा महिन्यात दोन वेळा जिवघेणे हल्ले करण्यात आले. दोन वर्षापूर्वीदेखील माजी सरपंचाने धमकी दिल्याची माहिती मिळाली. याबाबत चांदणे यांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली, मात्र राजकीय दबावामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच अखेर एकाकी लढणाºया चांदणे याला जीव गमवावा लागल्याचे नातेवाईतांचे म्हणणे आहे.घटनेतील संशयीत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याचा चांदणे कुटुंबीयांचा आरोप आहे. संशयीत मुख्य सूत्रधार असलेल्या चंद्रशेखर वाणी याची गावात दहशत असल्याचा आरोप मयत चांदणे याचा भाऊ राजू याने केलेला आरोप गंभीर असून त्याची पोेलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे.गरीबीत जीवन जगत असलेले वाकडीतील मातंग समाज बांधव मोलमजुरी करतात. आम्हाला सुखाने जगू द्या हीच त्यांची अपेक्षा आहे. पण सत्ताधाºयांच्या जीवावर त्यांना जगणे कठीण केले असल्याचे आरोप होत आहे. गावातील मागासवर्गीय असुरक्षीत असून त्यांच्यात सुरक्षीतचेची भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचा मुद्दा आता पुढे आला आहे.निवडणुकांमुळे नेत्यांचे दुर्लक्षतालुक्यात एव्हढी गंभीर घटना घडूनदेखील सत्ताधारी अथवा विरोधकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मागासवर्गीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे, मात्र मते मागायला याल तेव्हा जाब विचारु अशी संतप्त भावना वाकडीचे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव