शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पितृदिन विशेष- वडीलच माझ्यासाठी ‘आई’सुद्धा; आईच्या निधनानंतर वडील आई व परमेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST

जितेंद्र शिंदे : शिक्षण घेत असतानाच आई वारल्यामुळे वडीलच ‘सर्वकाही’ प्रमोद पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कासोदा, ता. एरंडोल : ...

जितेंद्र शिंदे : शिक्षण घेत असतानाच आई वारल्यामुळे वडीलच ‘सर्वकाही’

प्रमोद पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कासोदा, ता. एरंडोल : शालेय शिक्षण घेत असतानाच दीर्घ आजाराने आई वारली; पण तत्पूर्वी आईच्या आजारपणाचा मोठा खर्च, त्यानंतर आलेला अकाली मृत्यू, पुढे माझे शिक्षण, अशी दुहेरी जबाबदारी मला नोकरी लागेपर्यंत वडिलांनाच पार पाडावी लागली. आई- वडील व परमेश्वर हे सर्वकाही माझ्यासाठी वडीलच आहेत, अशा भावना जितेंद्र अजाबसिंग शिंदे याने व्यक्त केल्या आहेत.

२० जूनला साजऱ्या होणाऱ्या पितृदिनानिमित्त जितेेंद्रने आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजाबसिंग बळीराम शिंदे हे तसे मूळचे जैतपीर, ता. अमळनेरचे; पण आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याने त्याकाळी अकरावीच्या वर्गानंतर पोटापाण्यासाठी अमळनेर सोडून यवतमाळ, जळगाव, मुंबई, अशा ठिकाणी कामासाठी जावे लागले.

पुढे टेलरिंगचा कोर्स केल्यानंतर परत अमळनेर येथे येऊन सुशिक्षित बेरोजगारांसाठी टेलरिंग काम शिकवण्याचे क्लास सुरू केले. त्यातच पत्नीला गंभीर आजार जडला. पत्नीचा आजारपणाचा खर्च नऊ वर्षे केला.

आई वारल्यानंतर चार बहिणी व मी अशांच्या शिक्षणाचा खर्च व कुटुंबातील खर्च यांची सांगड घालताना नाकीनऊ येत असतानाच मोठ्या धीराने व आत्मविश्वासाच्या जोरावर वडिलांनी चार बहिणींचा लग्नखर्च सोसला व मला इंजिनिअर बनविण्याचे अशक्यप्राय स्वप्न लीलया पार पाडले आहे.

वडिलांचे जास्त शिक्षण झालेले नसताना, तसेच आम्ही खुल्या प्रवर्गात मोडत असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षणाची सवलत नव्हती. योग्य काॅलेज शोधणे, त्या काॅलेजची महागडी फी भरणे, जेवण व राहण्याचा खर्च, हे मोठे दिव्य काम त्यांनी पार पाडले आहे.

ते माझ्यासाठी वडिलांसोबतच ‘आई’पण

मात्र, बाप हा बापच असतो. निधड्या छातीने संकटांवर मात करण्याचे कसब त्याला कुठल्याही शाळेत शिकायला जावे लागत नाही. आपल्या एकुलत्या मुलासाठी कष्ट करायला चार हात करण्यासाठी त्याची इम्युनिटी दहापट वाढते. असे धीरोदात्त माझे पिता अजबसिंग शिंदे यांनी मला उच्चशिक्षित इंजिनिअर बनवले. देशातील अग्रगण्य अशा एका नामांकित कंपनीत मुंबईत प्रोग्राम मॅनेजर, अशा महत्त्वाच्या पदावर मी कार्यरत आहे. याचे श्रेय माझ्या जन्मदात्याला जाते. ते माझ्यासाठी वडिलांसोबतच ‘आई’पण आहेत, अशी भावनाही जितेंद्र अजाबसिंग शिंदे याने व्यक्त केली.

===Photopath===

190621\img-20210619-wa0242.jpg

===Caption===

वडील अजबसिंग शिंदे सह इंजिनिअर पूत्र जितेंद्र शिंदे