शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलींसह पित्याने घेतली रेल्वेखाली उडी, पित्याचा जागीच मृत्यू, पाळधी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:54 IST

दोन्ही चिमुरडींची मृत्यूशी झुंज

ठळक मुद्देदोन्ही मुली रक्ताच्या थारोळ्यात 

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 06-  कौटुंबिक वादातून महेंद्र उर्फ बाळू गुलाब कोळी (वय 32, रा.पाळधी,ता.धरणगाव) या पित्याने श्रध्दा (वय 5) व दिव्या (वय 3) या दोन मुलींसह धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. त्यात महेंद्र याचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता पाळधी येथे ही घटना घडली.   याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  महेंद्र उर्फ बाळू हा तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आई, प}ी व दोन मुलींसह तो पाळधी येथे वास्तव्याला होता. गेल्या दोन दिवसापासून कुटुंबात वाद सुरु होता.गुरुवारी सायंकाळीही घरात टोकाचा वाद झाला. शुक्रवारी दुपारी याच वादातून बाळू याने श्रध्दा व दिव्या या दोन्ही मुलींना कडेवर घेत थेट रेल्वे रुळ गाठले. रेल्वे गाडीची प्रतिक्षा करीत तेथे थांबला.धरणगावकडून भुसावळकडे जाणारी माल गाडीजवळ येताच दोन्ही मुलींसह त्याने रेल्वेखाली झोकून दिले. हा प्रकार लक्षात येताच चालकाने तत्काळ गाडी थांबविली तर गेटमन व अन्य कर्मचा:यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, तोर्पयत त्याचा मृत्यू झालेला होता.  

दोन्ही मुली रक्ताच्या थारोळ्यात  रेल्वे कर्मचारी व लोकांनी घटनास्थळी धाव घेतली असता दिव्या व श्रध्दा या दोन्ही मुली रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. लोकांनी त्यांना तत्काळ गावातील दवाखान्यात दाखल केले. जि.प.सदस्य प्रताप पाटील यांना रुग्णवाहिकेसाठी रेल्वे कर्मचा:याचा फोन आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका रवाना करुन जखमी मुली दाखल असलेल्या ठिकाणी धाव घेतली. तेथे मुलींची ओळख पटत नव्हती. नंतर त्यांच्या गल्लीतील एका तरुणाने या मुलींना ओळखले. त्यांना लागलीच तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले तर नंतर मृत महेंद्र यालाही रुग्णालयात आणले.  दीड महिन्यापूर्वीच झाले होते दुसरे लगA  महेंद्र याची प}ी लता हिचा सहा महिन्यापूर्वी पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. प}ीच्या मृत्यूनंतर लहान मुलींची चिंता असल्याने महेंद्र याने प}ीची लहान बहिण ममता हिच्याशी दीड महिन्यापूर्वीच विवाह केला होता. या विवाहाच्या कारणावरुनच कुटुंबात वाद सुरु असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. महेंद्र याच्या वडिलांचे निधन झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर महेंद्रच्या भावाची प}ी व बहिणीने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. चिमुरडय़ांची अवस्था पाहता त्यांनी प्रचंड आक्रोश केला.

 दिव्या व श्रध्दा या दोन्ही मुलींच्या डोक्याला व मेंदूला जबर मार लागला आहे. दोन्ही मुली बेशुध्द असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी साकेगाव येथील गोदावरी रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले. मयत महेंद्र हा रिक्षा चालक होता. स्वत:च्या मालकीच्या दोन रिक्षा आहेत. त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.