शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाप दूर, आईचा हात लुळा... पोटासाठी करतोय भंगार गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : बाप दूर सुरतला कामाला.... आईचा उजवा हात हलका पडलाय... परिस्थिती चांगली असती तर कशाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : बाप दूर सुरतला कामाला.... आईचा उजवा हात हलका पडलाय... परिस्थिती चांगली असती तर कशाला भंगार गोळा केले असते... कसले ऑनलाईन शिक्षण... अशी व्यथा एका चिमुकल्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

खरंच बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण होतेय का? असा प्रश्न समाजाला पडला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर तीन चिमुकली पोत्यात भंगार गोळा करीत होती. लोकमत प्रतिनिधीने ऑन दि स्पॉट रिपोर्ट घेतला. तिसरी, चौथी, पाचवीतील तीन मुले प्लास्टिक बाटल्या, दारू, बीअरच्या रिकाम्या बाटल्या गोळा करीत होती. त्यातील मोठ्या मुलाला विचारले असता त्याने शहरातील एका शाळेत तिघे शिकत असल्याचे सांगितले. त्यातील एकाने तर माझे नाव दोन शाळांमध्ये असल्याचे सांगितले.

वडील काय करतात असे विचारले असता त्याने केविलवाण्या चेहऱ्याने सांगितले की, वडील सुरतला असतात. तीन-चार महिन्यांनी येतात. आईला एकाच वेळी मुंगूस आणि साप चावल्याने उजवा हात लुळा पडला आहे. त्यामुळेच भंगार गोळा करावे लागते. माझी बहीण सातवीच्या वर्गात शिकते, तीदेखील वीट भट्टीवर जाते. ५०० विटा वाहिल्या की ७५ रुपये रोज मिळतात. मला भंगार गोळा केल्यानंतर दीडशे ते दोनशे रुपये मिळतात. त्यातून या दोन्ही लहान्यांना हिस्सा द्यावा लागतो. ऑनलाईन शिक्षण नाही घेत का? असे विचारल्यावर घरी साधा मोबाईल आहे. नवा मोबाईल जर घेतला तर मला चोरून आणला म्हणून चोर ठरवतील, असेही त्याने सांगितले.

कधी खूप भंगार सापडते, तर कधी काहीच सापडत नाही. सकाळपासून प्लास्टिक व बाटल्या गोळा करून थकल्यानंतर त्यांनी आपल्याजवळील पैशातून कोपऱ्यात एका बाकावर बसून चहाचा आस्वाद घेतला अन् त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवादेखील दूर झाला. एकीकडे हॉटेल आणि मिठाईच्या दुकानावर अमळनेरात काही मुले भीक मागताना, फुकटचे खायला मागताना आढळून येतात. मात्र, प्रामाणिकपणे कष्ट करून, आपल्याच पैशांनी चहा पिऊन भूक भागविणाऱ्या या चिमुकल्यांचे साऱ्यांनाच कौतुक वाटले.

शासन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करते, बालमजुरी प्रतिबंधक कायदाही अमलात आणला, बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण आहे, समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत, दररोज वर्तमानपत्रात देणगीदारांचे कार्य छापून येते. तरीदेखील अमळनेर शहरात असे विसंगत चित्र दिसून आले.

120821\12jal_9_12082021_12.jpg

बाप दूर, आईचा हात लुळा ...पोटासाठी करतोय भंगार गोळा