शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पिता-पुत्रावर एकाचवेळी अत्यंसस्कार

By admin | Updated: April 2, 2017 00:45 IST

सिंधी कॉलनीत शोककळा : घटनेचे कारण गुलदस्त्यात

जळगाव : रेल्वेस्थानकावर हबीबगंज, कुर्ला एक्स्प्रेसमोर आल्याने सुनील तुलसीदास कावणा यांचा शुक्रवारी मध्यरात्री जागीच मृत्यू झाला होता़ शनिवारी सकाळी उपचारादरम्यान सात वर्षीय बालक यश कावकावणा याचाही मृत्यूही झाला असून आई कीर्ती गंभीर जखमी आहे़ बाप सुनील व मुलगा यश या दोघांची एकाच वेळी सिंधी कॉलनीतून अंत्ययात्रा निघाली़ दरम्यान मुलाला वेळेवर उपचार मिळाले असते तर त्याचा मृत्यू झाला नसता, अशी खंत अशोक मंधान यांनी व्यक्त केली़ याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तिघांनी आत्महत्या केली की? त्यांचा अपघात झाला हे घटनेचे कारण गुलदस्त्यात आहे़रुग्णालयात बालकाचा मृत्यूयशवर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते़ डोक्याला खोलवर जखमी झाली होती़ यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला़ त्याची शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे डॉ.संजीव हुजुरबाजार यांनी मंधान यांच्यासह नातेवाईकांशी बोलताना सांगितले़ स्वत:चा श्वास घेऊ शकत नसल्याने यशला कृत्रिम श्वासोच्छवासाचे मशीन लावण्यात आले होते़ यानंतर अनेक दिवस यश यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमीच असल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला होता़ दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास त्याला नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात हलविले़ याठिकाणी १५ ते २० मिनीटांच्या काळातच येथील वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित केले़ घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद  आहे़ कीर्ती कावणा यांना जबर दुखापत आहे़ त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी पीएसआय खलील शेख व अनिंद्र नगराळे यांनी  हॉस्पिटल गाठले़ मात्र त्या बोलण्याच्या परिस्थिती नसल्याने तिचा जबाब नोंदविता आला नाही़ कीर्ती यांच्या जबाबानंतर  घटनेचे कारण स्पष्ट होईल.