जामनेर : वेळेची मर्यादा संपल्यानंतरही बाजारात हातगाडीवर फळे विकणाऱ्या विक्रेत्यांना हटवण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या अरशद युसूफ पठाण याला पहूर पोलिसांनी मंगळवारी जामनेर न्यायालयात हजर केले. न्यायाधीश सचिन हवेलीकर यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फत्तेपूर (ता. जामनेर) येथे सोमवारी सकाळी ११. ४५च्या सुमारास बस स्टॅन्ड चौकातील फळ विक्रेत्यांना पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे, दिनेश मारवडकर व होमगार्ड हटवत असताना युसूफ शब्बीर खा पठाण, अरशद युसूफ पठाण, मेहबूब शब्बीर खा पठाण व मोहसीन महेमूद पठाण (सर्व, रा. फत्तेपूर) यांनी कारवाईस विरोध केला. यातील एकाने पोलिसांच्या डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न केला. यातील अरशद यास अटक करण्यात आली असून, त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील ्रॲड. कृतिका भट यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.
फत्तेपूर हल्ला प्रकरणातील संशयितास कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST