शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय कारागिरांचे भवितव्य टांगणीला

By admin | Updated: March 12, 2016 00:38 IST

अर्थसंकल्पात 1 टक्का एक्साईज डय़ुटीसह विविध जाचक तरतुदींच्या निषेधार्थ 10 दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे व्यापा:यांसह आता कारागिरांचेही हाल होऊ लागले

धुळे : अर्थसंकल्पात 1 टक्का एक्साईज डय़ुटीसह विविध जाचक तरतुदींच्या निषेधार्थ 10 दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे व्यापा:यांसह आता कारागिरांचेही हाल होऊ लागले आहेत. केंद्र सरकार अर्थसंकल्पातील संबंधित तरतुदी आणि व्यापारी बंद मागे घेण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुळे आता चरितार्थ कसा चालवावा, असा यक्ष प्रश्न स्थानिक तसेच परप्रांतीय मिळून सुमारे 1200 कारागिरांपुढेही उभा आहे. बंगाली कारागिरांनी तर परतीची वाट धरली आहे. ऐन लगAसराईच्या हंगामात ही स्थिती उद्भवल्याने कारागिरांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. आता सरकारच्या निर्णयावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

सराफा बाजारात व्यापा:यांची शंभरावर दुकाने आहेत. कलाकुसरीचे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम मुख्यत्वे बंगाली कारागीर करतात. येथे या कारागिरांची संख्या सुमारे 500 एवढी आहे. त्यात काही कुटुंबांसह येथे आले आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या या कारागिरांची संख्या 700-800 वर पोहचते.

स्थानिक मराठी अहिर सुवर्णकार कारागिरांची 50 कुटुंबे या व्यवसायात आहेत. एका कुटुंबात सरासरी तीन सदस्य धरले तरी 150 ते 200 जणांचा उदरनिर्वाह कारागिरीवर अवलंबून आहेत. सोन्या-चांदीच्या विविध दागिन्यांची दुरुस्ती, नाक-कान टोचणे, दागिन्यांना पॉलिश अशी कामे हे कारागीर करतात. दिवसाकाठी 200-250 रुपये मिळतात. त्यावर घर चालते. परंतु आता तेच ठप्प झाल्याने स्थिती अडचणीची झाली आहे.

कोल्हापूर, सोलापूर येथून 40-50 वर्षापूर्वी येथे आलेल्या कारागीर कुटुंबांची संख्याही 40 र्पयत आहे. त्यांना गलई किंवा घाटी कारागीरही म्हटले जाते. ते प्रामुख्याने दागिने गाळण्याचे (गलई) काम करतात. परंतु सध्या बंदमुळे त्यांनाही काम उरलेले नाही.

या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मारवाडी सुवर्णकार कुटुंबांची संख्याही मोठी आहे.