सन २०१९-२० मधील वेगवान वाऱ्यामुळे केळीबागा उद्ध्वस्त होऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यापैकी काही शेतकऱ्ंयाना दोन महिन्यांपूर्वी संरक्षित विम्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली होती. उर्वरित शेतकऱ्यांची संरक्षित विमा न आल्याने त्यानी खासदार रक्षा खडसे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी विमा कंपनीने शर्थभंग केल्यास कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ताकीद दिल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ८.७१ कोटी रुपये नुकतेच जमा करण्यात आले असून अनेक जण मात्र विम्याच्या रकमेपासून अद्यापही मुक्ताईनगर तालुक्यातील विशेषकरून तापी काठावरील अंतुर्ली, पातोंडी,नरवेल, भोकरी,धामणदे यासह बहुतांश गावातील शेतकरीआजही वंचित आहे.
याबाबत जिल्हा कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर यांच्याशी चर्चा केली असता विमा कंपनीकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवयाचा आहे, असे त्यानी सांगितले. संरक्षित विम्याची रक्कम एक महिन्याच्या आत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा तापी काठावरील गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे.