शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 13:05 IST

चोपडा येथील घटना, चालक वाहनासह फरार, अकस्मात मृत्यूची नोंद

ठळक मुद्देबैलांना खळ्यात बांधून घरी परतत असतांना झाला अपघातओळख पटत नसल्याने, मृतदेह घटनास्थळी पडूनअकस्मात मृत्यूची नोंद
आॅनलाईन लोकमत चोपडा, जि.जळगाव , दि...२२ :अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, अशोक विठ्ठल बडगुजर (५४) हा शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना २१ रोजी रात्री घडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोळ्याच्या दिवशी अशोक बडगुजर (रा. साळीवाडा,चोपडा) यांनी बैल मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यानंतर बैलांना खळ्यात बांधून रात्री आठ वाजेच्या सुमारास ते घरी परत येत होते. शहरातील नदीकाठालगत असलेल्या आशा टॉकीज ते रामपुरा भागातील रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने, ते जागीच गतप्राण झाले. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला.दरम्यान शेतकºयाची ओळख पटत नसल्याने, काहीवेळ मृतदेह घटनास्थळी पडून होता. त्याच्या खिशात शालकाचे ओळखपत्र सापडले. त्यावरून नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर शेतकºयाची ओळख पटली. त्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, डॉ. नरेंद्र पाटील यांनी वाहनाच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.