शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांची दिवाळी होणार गोड - ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कार सोहळ्य़ात गिरीश महाजन यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 22:43 IST

5 लाख सौरपंप शासन देणार

ठळक मुद्देनदीजोड प्रकल्पाचे लवकरच मोठे काम होणार.. तर शेती फायदेशीरच

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 7 - राज्य शासनाने कजर्माफी जाहीर केली आहे. ही कजर्माफी करताना कोणावरही अन्याय होवू नये याची काळजी घेतली जात असून पैसे मिळण्यास थोडा विलंब होत असला तरी  दिवाळीर्पयत पात्र शेतक:यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा होवून शेतक:यांची दिवाळी गोड होणार, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. जैन इरिगेशन सिस्टीम लि. प्रस्तुत ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी सकाळी शहरातील कांताई सभागृहात झाला़. यावेळी ते बोलत होते.  सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खान्देशातील 25 शेतक:यांना ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कारने गौरविण्यात आले. 

 गिरीश महाजन म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यात दरवर्षी कोठे फारच कमी तर कोठे खूपच जास्त पाऊस होतो. यामुळे सरकारकडून नदीजोड प्रकल्प राबविण्यास प्राधान्य दिले जात आहे.  महाराष्ट्राचे नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा मंत्रिपद आल्याने आता महाराष्ट्राची प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. राज्यासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळणार असून दोन वर्षात मोठय़ा प्रमाणावर हे काम झालेले असेल. यामुळे दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मोठी मदत  होईल. 

शेती परवडत नाही, असा गैरसमज शेतीबद्दल आहे. परंतु मेहनत, तंत्रज्ञान व नियोजन याची सांगड घातली तर कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळते. हे अनेक शेतक:यांनी दाखवून दिले आहे. एकरी एक ते पाच लाख उत्पन्न शेतकरी घेतात. 

विजेच्या प्रश्नावर  मात करण्यासाठी शासन शेतक:यांना लवकरच 5 लाख सौरउर्जा पंपांचे वितरण करणार आहे. सर्व फिडरही सौर उज्रेने जोडणात येणार आहे. शेतक:यांना सौर पंपासाठी अनुदान दिले जात आहे.  तसेच राज्यात जलसंधारणाची कामेही मोठय़ा प्रमाणावर झाली  आहेत. पाटाच्या पाण्यावरही वीज निर्मितीचे धोरण असून शासनाचे शाश्वत शेतीसाठी प्रयत्न सुरु असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.  येत्या दोन वर्षात जिल्ह्यासह राज्यातील अनेक धरणांची कामे पूर्ण झालेली दिसतील अशी ग्वाहीही गिरीश महाजन यांनी दिली.