शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे भाव वाढूनही शेतकऱ्यांचा नशिबी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:15 IST

जिनर्सने थांबवली खरेदी

ठळक मुद्देकमी भावात व्यापाऱ्यांना द्यावा लागतोय माल, साटेलोट्यामुळे शेतकऱ्यांना वैताग

जळगाव : संपूर्ण हंगाम कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री न करणाºया शेतकºयांना आता भाव वाढल्यावर देखील निराशाच पदरी पडत आहे. कापसाचे दर ६ हजार रुपयांपर्यंत गेल्यावर जिल्ह्यातील अनेक जिनर्सनी खरेदी थांबवली आहे. शेतकºयांना आता व्यापाºयांना कमी भावात कापूस विक्री करावा लागत असल्याचे चित्र आहे. जिनर्स व व्यापाºयांचा या खेळीमुळे शेतकºयांना भाव वाढूनही फायदा होताना दिसून येत नाही.सप्टेंबर २०१८ मध्ये यंदाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. सुरुवातीचे काही दिवस बाजारात कापूस नसताना भाव हे ६ हजार रुपयांपर्यंत होते. मात्र, आॅक्टोबर अखेरपर्यंत नवीन कापूस बाजारात आल्यानंतर कापसाचे भाव ५५०० पर्यंत आले. भविष्यात भाव वाढतील या अपेक्षेने शेतकºयांनी आॅक्टोबर ते जानेवारीपर्यंत विक्रीसाठी माल बाजारात आणलाच नसल्याने बाजरात मंदीचे सावट होते. आंतराष्टÑीय बाजारात सरकीला भाव नसल्याने कापसाला मागणी नसल्याने भावात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र, आता मार्चच्या दुसºया आठवड्यापासून कापसाच्या भावात वाढ झाल्यावर शेतकºयांकडून माल विक्रीसाठी आणला जात असताना, जिनर्सकडून कापूस खरेदीस नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव आपला माल व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे.जिनर्स व व्यापाºयांचे साटेलोटेकापसाचे भाव सध्या ५८०० ते ६१०० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी जिनींगवर कापूस विक्रीसाठी गर्दी केली. मात्र, जिनर्सने खरेदी थांबवली आहे. त्यामुळे घरात कापूस असूनही खरेदीदार नसल्याने शेतकºयांवर संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत गावोगावी जाणाºया व्यापाºयांकडूनही जो माल खरेदी केला जात आहे. त्या मालाला ५५०० ते ५६०० रुपयांपर्यंतचे भाव निश्चित करण्यात आले आहेत. जिनर्स कापूस खरेदी नकार देत आहेत आणि ६१०० रुपये भाव असताना तब्बल ४०० ते ५०० रुपये कमी दराने शेतकºयांना माल विक्री करावा लागत आहे. शेतकºयांकडून ५५०० ते ५६०० रुपयांमध्ये खरेदी केलेला माल व्यापारी जिनर्सला ५८०० रुपयांपर्यंत देत आहेत. यामध्ये व्यापारी व जिनर्सला लाभ मिळत असून, शेतकºयांचे मात्र नुकसान होत आहे.शेतकºयांकडे कापूस पडलेलाचमार्च महिन्यात शेतकºयांकडील कापूस जवळ-जवळ विक्री होवून गेलेला असतो. यावर्षी मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. यंदा बºयाच शेतकºयांनी जानेवारीपर्यंत आपला माल विक्रीच केला नव्हता. फेब्रुवारी महिन्यात भाव वाढीच्या अपेक्षा भंग झाल्यानंतर बºयाच शेतकºयांनी कापूस विक्री केला. मात्र, पुन्हा भावात घसरण होवून हमीभावापेक्षाही कमी दरात कापूस खरेदी केला जात असल्याने मार्च अखेरपर्यंत भाव वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री केला नव्हता. आता भाव वाढल्यामुळे शेतकºयांकडून कापूस विक्री केला जात आहे. दरम्यान, अजून काही दिवस कापसाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.