शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांचे मरण हेच सरकारचे धोरण

By admin | Updated: April 22, 2017 15:50 IST

केंद्रातील भाजपा सरकार शेतक:यांच्या रक्ताचे शोषण करणारे असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा:या शेतक:यांवर गुजरात पोलिसांनी लाठय़ा चालवल्या.

रघुनाथ पाटील यांची टीका : गुजरात पोलिसांनी चालवल्या शेतक:यांवर लाठय़ा; शेतकरी संघटनेतर्फे निषेधसाक्री, जि. धुळे, दि. 22 -   शेतक:यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळाव्यात म्हणून गुजरात राज्यातील त्यांच्या गावाला जाऊन शेतकरी रक्तदान करणार होते. परंतु, केंद्रातील भाजपा सरकार शेतक:यांच्या रक्ताचे शोषण करणारे असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा:या शेतक:यांवर गुजरात पोलिसांनी लाठय़ा चालवल्या. याचा शेतकरी संघटना निषेध करत आहे.  सरकारचे धोरण  शेतक:यांचे ‘मरण’ असल्याचे सांगत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. आमदार बच्चू कडू यांची आसूड यात्रा गुजरात राज्याच्या सीमेवर अडवल्यानंतर रघुनाथ पाटील हे साक्री मार्गाने माघारी येत होते.  साक्री येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला दुपारी त्यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी तालुकाप्रमुख विशाल देसले यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी ते ‘लोकमत’शी बोलत होते. या वेळी रघुनाथ पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका केली. देशात 31 वर्षानंतर एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर आले आहे. पूर्वीच्या राजकत्र्याप्रमाणेच हे सरकारही शेतकरी विरोधी आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे सरकार शेतक:यांचा बळी द्यायला निघाले आहे. देशात निर्माण होणा:या साखरेपैकी 80 टक्के साखर उद्योगासाठी वापरली जाते. त्यातील उद्योगपतींचा तोटा होऊ नये, म्हणून शेतक:याच्या उसाला कमी भाव दिला जातो. कापूस उत्पादनाचा सर्वात मोठा फायदा कापड उद्योगांना होतो, त्यामुळे कापासाचे भाव ठरवून पाडले जातात. भारत सरकार शेतकरी विरोधी असतानाही राज्यात झालेल्या जि.प., पं.स., महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकीत बहुमत मिळाले आहे. या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की लोकांसमोर दुसरा पर्यायच नाही, आजर्पयत जे सत्तेवर होते. त्यांनी ही शेतकरी विरोधी धोरण राबवले. त्यामुळे शेतक:यांनी कोणावर विश्वास ठेवायचा, शेतकरी संघटित नसल्याचा फायदा राज्यकर्ते उचलतात जे नेते शेतकरी आंदोलनात मोठे झाले. त्यांना सत्तेची गाजरे दाखविण्यात आली, असे त्यांनी सांगत आता हेच नेते सरकारची बाजू घेऊन बोलतात, हे शेतक:यांचे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले. आसूड यात्रा काढणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रामाणिकपणे शेतक:यांची बाजू उचलून धरली आहे. त्यांच्या आसूड यात्रेला शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे, म्हणून संघटना त्यांच्यासोबत आहे. शेतक:यांना कर्जमाफी नको आहे. तर त्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव हवा आहे, तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या तर राज्यात कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे त्यांनी सांगितले. कॉँग्रेस-राष्ट्रवादीवरही टिकाकॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने काढलेल्या संघर्ष यात्रेवर त्यांनी सडकून टीका केली. जे आजर्पयत सत्तेवर होते. त्यांनी शेतक:यांसाठी काहीच केले नाही. त्यांना आता शेतक:यांचा कळवळा आल्याचे ते म्हणाले. या वेळी शेतकरी संघटनेचे विदर्भ विभागप्रमुख दिनकर दाभाडे, मुंबई विभागप्रमुख गणेश घुगे, युवा आघाडी प्रमुख शंकर गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र संघटक अॅड. अविनाश पाटील उपस्थित होते.