शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर पाण्याची टाकी पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 14:15 IST

पाथरी येथील घटना

ठळक मुद्दे बैलगाडीचा दांडा तुटला

जळगाव : बैलगाडीवरुन पाणी घेऊन जाताना गाडीचा दांडा तुटल्याने गाडीवरील टाकी अंगावर पडून रघुनाथ तुळशीराम गायकवाड (५५, रा.पाथरी) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता पाथरी, ता.जळगाव येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.रघुनाथ गायकवाड हे पाणी घेण्यासाठी बैलगाडीने शेतात गेले होते. पाचशे लीटरच्या टाकीत त्यांनी शेतातील विहिरीतून पाणी भरले. घरी परत येत असताना रस्त्यात बैलगाडीचा दांडा तुटला. त्यामुळे गायकवाड हे गाडीच्याखाली कोसळले व त्यांच्या अंगावर पाण्याने भरलेली टाकी पडली. त्याखाली दाबल्या गेल्याने गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारील शेतातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून गावात घटना कळविली. सरपंच शिरीष पाटील, माजी सरपंच निलेश पाटील, संतोष नेटके, पोलीस पाटील संजीव लंगरे, राहूल पाटील, पुतण्या हरीष गायकवाड व इतर लोकांनी तातडीने मदतकार्य राबवून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अतुल पाटील यांनी पंचनामा केला.भावाचा प्रचंड आक्रोशदरम्यान, शवविच्छेदनगृहात भावाचा मृतदेह पाहताच लहान भाऊ शांताराम यांनी त्यांनी एकच हंबरडा फोडला. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी कोकीळाबाई, मुलगा पवन, मुलगी अमृता, मनिषा व सरला यांच्यासह भाऊ सुकलाल, कैलास व शांताराम असा परिवार आहे.