कजगाव ता.भडगाव : महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेत शिवारात भेट देत पीक परिस्थितीची पाहणी केली. या प्रसंगी अधिकाºयांचा मोठा लवाजमा त्यांच्या सोबत होता. शेतकºयांची मोठी गर्दी देखील या वेळी झाली होती. तथापि मंत्र्यांनी या पाहणी दौºयात फक्त अधिकाºयांशी चर्चा केली, मात्र नापिकी आणि दुष्काळाला तोंड देत असलेल्या शेतकºयांचे मनोगत वा प्रतिक्रीया जाणून न घेतल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या.पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे चाळीसगाव, भडगाव, व पाचोरा या तीन तालुक्यातील दुष्काळी स्थितीच्या पाहणी दौºयावर आले असता भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका कापूस लावलेल्या शेताची पाहणी त्यांनी केली. या प्रसंगी जिल्ह्यातील अधिकाºयांचा मोठा लवाजमा त्यांच्यासोबत होता.अधिकाºयांकडून दुष्काळी स्थितीची सर्व माहिती जाणून घेत त्यांनी काही सूचना अधिकाºयांना दिल्यात मात्र उपस्थित शेकडो शेतकºयांशी कोणतीही चर्चा केली नाही, किंवा त्यांचे मत जाणून न घेतल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त झाला.मळगाव चारीचे दिले निवेदनबारा वर्षापूर्वी सुरू झालेल्या मळगाव पाटचारीचे काम अर्धवट झाले आहे या कामावर निधी देखील खर्च झालेला आहे. अनेक शेतकºयांच्या जमिनी यात गेल्या आहेत. मंजूर पाट चारीवर बराच निधी खर्च झालेला आहे. तथापि शेतकºयांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या पाटचारीचे काम अचानक थांबविण्यात आले. एवढेच नव्हे तर सदर पाटचारीची फाईलच बंद करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ती का बंद करण्यात आली याचा कोणताही खुलासा आजपर्यंत झालेला नाही. या पाटचारीचे काम पूर्ण झाले असते तर चाळीसगाव, भडगाव, आणि पाचोरा या तीन तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता. त्याचबरोबर शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असते. बागायत क्षेत्र वाढले असते. या मुळे सदर पाटचारीचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तांदुळवाडीचे माजी सरपंच सुभाष पाटील, पिंप्री येथील सरपंच पती शांताराम पाटील, कजगावचे सरपंच पती दिनेश पाटील, घुसर्डी सरपंच, हिंगोणे सीमचे सरपंच ज्ञानेश्वर महाजन व परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. या बाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश अधिकाºयांना त्यांनी दिले.पालकमंत्र्याची केवळ अधिकाºयांशी चर्चादुष्काळाच्या पाहणी दौºयावर आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ अधिकाºयांशी चर्चा केली. शेतकºयांशी चर्चा न करताच दहा मिनिटात पाहणी दौरा आटोपून ते पुढे मार्गस्थ झाल्याने उपस्थित शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. यात हिंगोणेसीम ता.चाळीसगाव येथील सरपंच ज्ञानेश्वर महाजन, तांदुळवाडीचे माजी सरपंच सुभाष पाटील, बेलगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील यांनी शेतकºयांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
पालकमंत्र्यांनी व्यथा जाणून न घेतल्याने शेतकरी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 17:44 IST
जळगाव जिल्ह्यातील गिरणा परिसरातील दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आलेल्या महसूल आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी तांदुळवाडी ता. भडगाव परिसरात पाहणी करतांना केवळ अधिकाºयांशी चर्चा केली. शेतकºयांच्या व्यथा त्यांनी जाणून न घेतल्याने नाराज शेतकºयांनी संताप व्यक्त केला.
पालकमंत्र्यांनी व्यथा जाणून न घेतल्याने शेतकरी संतप्त
ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा गिरणा परिसरात दुष्काळ पाहणी दौरामंत्र्यांसोबत अधिकाºयांचा होता मोठा लवाजमा मळगाव पाटचारी पूर्ण करण्याबाबत शेतकºयांनी दिले निवेदन