शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तूर उत्पादकांच्या पदरी यंदाही निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:28 IST

70 टक्के माल विक्रीनंतर खरेदी केंद्र

ठळक मुद्देहमी भावातून खर्चही निघणार नसल्याची शेत-यांची व्यथाअस्मानी संकटापाठोपाठ सरकारकडूनही चेष्टा

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 4 -  उशिरा लागवड व किडींचा प्रादुर्भाव यासह विविध कारणांमुळे  आधीच कमी उत्पादन आलेल्या तुरीला यंदाही अपेक्षित हमी भाव न मिळाल्याने शेतक:यांची निराशा झाली आहे. त्यात जवळपास 70 टक्के माल शेतक:यांनी व्यापा:यांना विक्री केल्यानंतर शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होत असल्याने सरकारचे ‘वराती मागून घोडे’ असल्याचा आरोप शेतक:यांमधून होत आहे. 

अस्मानी संकटापाठोपाठ सरकारकडूनही चेष्टाउशिरा आलेल्या पावसामुळे मुळातच तुरीची लागवड उशिरा झाली. त्यात वातावरणाच्या परिणामामुळे  किडींचा प्रादुर्भाव अशा कारणांमुळे तुरीच्या उत्पादनात घट आली. लागवड क्षेत्रातून अपेक्षित उत्पादनापैकी यंदा 25 टक्केही तुरीचे उत्पन्न हाती आले नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे.  या अस्मानी संकटांचा सामना करावा लागत असताना सरकारने जो हमी भाव जाहीर केला त्यात उत्पादन खर्चही निघणार नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी 5400 रुपये प्रति क्विंटल भाव सरकारने दिला. त्यात यंदा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असताना किमान 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते, मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ 50 रुपयांची भर टाकून 5450 रुपये भाव देऊन शेतक:यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केल्याचा आरोप शेतकरी किशोक चौधरी यांनी केला आहे. 

खरेदी केंद्रांची प्रतीक्षाच2017-18 या हंगामासाठी तुरीची खरेदी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी 2 रोजी अमळनेर येथील एकमेव केंद्रावर खरेदी सुरू झाली. शेतक:यांच्या मालाला भाव व बाजारपेठ मिळावी म्हणून खरेदी केंद्र सुरू करण्यात येत असले तरी ते वेळेवर व हमी भाव देणारे नसल्याने शेतक:यांची परवडच होत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे.  व्यापा:यांकडे विक्रीला पसंतीशासकीय तूर खरेदी केंद्रावर मालघेवूनगेल्यानंतर तेथे ‘एफक्यू’ दर्जाचाच माल पाहिजे, असा आग्रह असतो. परिणामी शेतक:यांची मोठी अडचण होते. यामुळे गेल्या वर्षी शेतक:यांनी चाळणीचा खर्च स्वत: करीत तूर विक्री केली. त्यामुळे यंदा तूर खरेदी केंद्रावर यांत्रिक चाळणी उपलब्ध करण्याची मागणी शेतक:यांची आहे. 

यंदा तुरीचे उत्पादन घटलेअसून हमी भावातून उत्पादन खर्चही निघणार नाही. किमान 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळण्याची अपेक्षा होती. हाती पैसा नसल्याने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वीच शेतक:यांनी 70 टक्के तूर शेतक:यांनी विक्री केली आहे.- किशोर चौधरी, शेतकरी तथा अध्यक्ष नवनिर्मिती शेतकरी मंडल असोदा