शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, व्यापारी होणार ‘बेलगंगे’चे मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 01:02 IST

चाळीसगाव : चित्रसेन पाटील यांची माहिती

चाळीसगाव/जळगाव : केंद्र सरकारच्या एम. एस. टी. सी. विभागाच्या ‘बेलगंगा’ सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत अंबाजी ट्रेडिंग कंपनीने सहभाग घेऊन सर्वाधिक ३९ कोटी २२ लाख १ रुपया अशी बोली लावली. निविदेपोटी भरावयाचे ३ कोटी ९२ लाख रुपये अदा केले.  कारखाना हा तालुक्याच्या जिव्हाळ्याचा विषय असून तो लोकसहभागातून येत्या गळीत हंगामात सुरु करणार आहोत.  यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांना मालक होण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी  शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केले.   बेलगंगा हा स्थानिक भूमीपुत्रांनीच सुरू करावा.  याबरोबरच तो लोकसहभागातून कार्यरत होत असल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे व बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे- खेवलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याचा उल्लेख  करताना पाटील यांनी  लोकसहभागाची प्रक्रिया विषद केली़संचालक मंडळ घेणार अंतिम निर्णय ४जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील बेलगंगा सहकारी साखर कारखान्याची ई निविदेव्दारे लिलाव प्रक्रिया झाली. मात्र याप्रश्नी अंतिम निर्णय हा जिल्हा बँकेचे संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ४शासनाच्या एका एजन्सीकडून कारखाना विक्री करण्याच्या प्रयत्नांना पहिल्यांदाच जिल्हा बँकेला यश आले आहे. यापूर्वी जिल्हा बँकेने स्वत:  बेलगंगासह वसंत कारखाना व इतर मालमत्ता विक्री करण्याचा प्रयत्न केला मात्र अमळनेरच्या जागेव्यतिरिक्त जिल्हा बँकेला यश आले नव्हते. त्यामुळे बँकेने एजन्सीमार्फत कारखाना विक्रीकरण्याचा प्रयत्न केला आहे.४२००२ पासून बेलगंगा सहकारी साखर कारखाना बंद आहे. म्हणून बॅँकेने आॅनलाइन पद्धतीने कारखाना विक्रीची प्रक्रिया राबविली. बेलगंगा कर्मचाºयांची उद्या बैठक चाळीसगाव- बेलगंगा साखर कारखाना कामगार युनियनची बैठक शासकीय विश्रामगृहात १५ रोजी आयोजित केली आहे.  सभेस औरंगाबाद खंडपीठाचे अ‍ॅड. एस. एस. कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहे.गेल्या १२ रोजी मुंबईत निविदा प्रकिया पूर्ण  झाल्यानंतर सर्वात जास्त बोली ही चाळीसगाव येथील अंबाजी ट्रेडींग कंपनीची असल्याचे समोर आले. माजी चेअरमन चित्रसेन पाटील, माजी व्हाईस चेअरमन रवींद्र पाटील, निलेश निकम, डॉ. अभिजीत पाटील यांच्या अंबाजी कंपनीने लिलावात भाग घेतला होता.