चाळीसगाव: चाळीसगाव ते जळगाव रस्त्यावर अपघात होवून 12 जण जागीच ठार झाले, असा खोटा मजकूर व्हॉटस्अपवरुन व्हायरल केला म्हणून तळेगाव येथील चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 21 मार्च रोजी सुभाष काकडे रा. तळेगाव याने व्हॉटस्अपवरुन दोन वाहनांमध्ये धडक होवून 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. यासह फोटोही व्हायरल केले होते. यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांनीही माहिती जाणून घेण्यासाठी एकमेकांना फोन केले. याबाबत पोलिसांनी तपास केला असता सुभाष काकडे याने ही खोटी माहिती पसरविल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासह इतर तिघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
व्हॉटस्अप वरुन खोटा मेसेज करणे भोवले, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: March 25, 2017 18:17 IST