शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 16:23 IST

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा पार पडला.

ठळक मुद्देमान्यवरांनी केले मार्गदर्शनमहाविद्यालयातून घडले अनेक मान्यवर

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा पार पडला. विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.व्यासपीठावर तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, मिलिंद वाघुळदे, प्राचार्य तुकाराम बोरोले, गणेश गुरव, प्रा.डॉ.जतीन मेढे, प्राचार्य नि.रा.फेगडे, चंद्रशेखर चौधरी, उपप्राचार्य प्रा.डी बी तायडे, उपप्राचार्य डॉ.उदय जगताप उपस्थित होते.प्राचार्य तुकाराम बोरोले यांनी शिक्षणाशिवाय उत्कर्ष होणार नाही याची जाणीव ठेवून या महाविद्यालयाची निर्मिती झाली आहे. श्रमसंस्कार या महाविद्यालयाने जपले आहे. या महाविद्यालयातून ज्यांनी शिक्षण घेतले त्यांनी स्वत:च्या विकासासोबत समाजाचाही विकास केला आहे या संस्थेने अनेक पिढ्या घडविल्या आहेत. म्हणून या संस्थेचा इतिहास जपून ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले.उपप्राचार्य डॉ.उदय जगताप यांनी नॅकसंदर्भातील आवश्यक माहिती दिली. गणेश गुरव यांनी या महाविद्यालयाने उच्च शिक्षणासोबत लोकशाही मूल्ये दिली. राष्ट्र निर्मितीमध्ये या महाविद्यालयाचे मोठे योगदान आहे.डॉ.कल्पना पाटील व मोजेस जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी यावल व रावेर तालुक्यातील आर्थिक, शैक्षणिक विकास या महाविद्यालयाने कसा केला याची माहिती दिली.संस्थेचे अध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी लोकसहभागातून धनाजी नाना महाविद्यालायची निर्मिती झाली आहे. या महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थांनी शिक्षण, समाज, अर्थ, विज्ञान, राजकारण कृषी क्षेत्रात आपलं नाव मोठं केलं आहे. महाविद्यालयात शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण दलित आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे. बदलत्या काळानुसार नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. पुढील काळात प्लेसमेंट सेल निर्माण करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन केले.यावेळी बहुसंख्येने माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डी.बी.तायडे, सूत्रसंचालन प्रा.कुमुदिनी धांडे, प्रा.राजेंद्र राजपूत यांनी, तर आभार प्रा.डॉ कल्पना पाटील यांनी मानले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयFaizpurफैजपूर