शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांकाअभावी शेतक:यांना कर्ज मिळेना

By admin | Updated: April 21, 2017 00:35 IST

अमळनेर : मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण 20 दिवसांपासून रखडले

अमळनेर : परवाना नूतनीकरणाअभावी मुद्रांक विक्रेत्यांचे दप्तर (रजिस्टर) जमा केल्याने तालुक्यात मुद्रांक मिळत नाहीत, त्यामुळे शेतक:यांचे कर्जासाठी हाल होत आहे.दरवर्षी मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने 31 मार्चनंतर नूतनीकरण केले जातात. प्रतिज्ञापत्रावर हे परवाने नूतनीकरण केले जात असत. मात्र या वर्षापासून पोलिसांचा चारित्र्य पडताळणी अहवाल आणि मुद्रांक विक्रेत्यावर बनावट मुद्रांक विकण्याबाबत कारवाई झालेली नाही. असा अहवाल मिळाल्याशिवाय परवाने नूतनीकरण झालेले नाहीत. पोलिसांचा अहवाल प्राप्त न झाल्याने 1 एप्रिलपासून मुद्रांक विक्रेत्यांचे दप्तर (रजिस्टर) दुय्यम निबंधकांनी जप्त  करून घेतल्याने गेल्या 20 दिवसांपासून मुद्रांक विक्री बंद आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.शेतक:यांना पीक कर्जासाठी, विविध कार्यकारी सोसायटी कर्जासाठी तसेच ठिबक सिंचन कर्जासाठी मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते, त्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतक:यांना मशागतीच्या कामांना सुरुवात करता आलेली नाही. मुद्रांक केव्हा मिळणार याची ठोस माहिती मिळत नसल्याने शेतकरी दररोज ग्रामीण भागातून शहरात भाडे खचरून येत आहेत. तसेच शौचालयाच्या अनुदानासाठीही गरिबांना प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते. त्याशिवाय टप्प्याने अनुदान मिळत नाही. म्हणून शौचालय बांधकामेही रखडली आहेत. परिणामी स्वच्छ महाराष्ट्र अभियानातही अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच गौणखनिजप्रकरणी कारवाई झालेली वाहनेदेखील प्रतिज्ञापत्राशिवाय सोडली जात नाहीत. तीही अडकली आहेत. मुद्रांकाअभावी जनतेचे करारनामे एप्रिल, मेअखेर होणारे भाडेपट्टे करार असे अनेक व्यवहार अडकल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत दुय्यम निबंधक कुमार मावळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.   येथील मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नुतनीकरणासाठी जिल्हाधिका:यांकडे पाठविले  आहेत. मात्र परवान्यांचे नुतनीकरण न झाल्याने, नागरिकांना स्टॅँपपेपर व तिकीटाचा पुरवठा करता येत नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने त्वरीत नुतनीकरण करून मिळावे अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे. तसेच नागरिकांचे होणारे हाल थांबविण्याची मागणी आहे.मुद्रांक विक्रेत्यांचे चारित्र्य पडताळणी अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मुद्रांक अधिकारी मावळे यांच्या हस्ते प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आले आहेत. ते प्राप्त झाल्यानंतर त्वरित देण्यात येतील.- विकास वाघ, पोलीस निरीक्षक, अमळनेर