शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मोक्याच्या जागांवर डोळा

By admin | Updated: August 1, 2014 15:28 IST

शहरातील मालमत्तांचे भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच मालमत्ता बळकावण्याचे किंवा जबरदस्तीने घर रिकामे करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत.

जळगाव : शहरातील मालमत्तांचे भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच मालमत्ता बळकावण्याचे किंवा जबरदस्तीने घर रिकामे करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकत्याच नवीपेठेत अविनाश लाँड्रीचा दुकानातील सामान रातोरात हलवून ताबा घेतल्याच्या प्रकारानंतर हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. मुंबई, पुण्याच्या पाठोपाठ जळगावातील मालमत्तांचे भाव असल्याने या महानगरांप्रमाणेच जळगावातही मालमत्ता हडप करणारे अनेक लहान-मोठे रॅकेट कार्यरत आहेत. मोक्याची जागा हेरून ती साम, दाम, दंड, भेद याचा वापर करीत हस्तगत करण्याचे उद्योग सुरू असतात. रेल्वे स्टेशनजवळ सेवाश्रम लॉजच्या मागील बाजूला असलेल्या एका इमारतीतील भाडेकरूंना अतिक्रमण विभागातील काही अधिकार्‍यांना हाताशी धरून अतिक्रमण तोडण्याबाबतच्या नोटीस बजावून धमकाविण्याचे व नंतर सोयीस्करपणे तडजोडीसाठी मार्ग सुचविण्याचा प्रकार घडला. दाणाबाजारात मूळ मालकाकडून मालमत्ता घेऊन त्याला दुसरी जागा देण्याचे आश्‍वासन देऊन नंतर फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. तर भवानीपेठेतही असाच फसवणूक करून व दमदाटी करून जागेचा ताबा घेतल्याचा प्रकार घडला आहे. नवीपेठेतही एका इमारतीतील भाडेकरूंना असाच त्रास देऊन जागा खाली करून घेण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही फारसा उपयोग होत नाही. कारण या रॅकेटमध्ये राजकीय क्षेत्रातील तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळी असल्याने पोलिसांना 'मॅनेज' करण्यातही ते तरबेज आहेत. तर न्यायालयात दाद मागितली तर हे विषय दिवाणी प्रकारात मोडतात. दिवाणी दावे वर्षानुवर्ष चालत असल्याने सर्वसामान्य माणसाला त्यामुळे कुठे दाद मागावी? असा प्रश्न पडतो. त्यामुळे मुला-बाळांच्या सुरक्षेचा विचार करीत जागेवर पाणी सोडावे लागते. केवळ इमारती किंवा घरच नव्हे तर रिकामे प्लॉटही अशाच प्रकारचे हातखंडे वापरून बळकावले जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

अशी आहे मॉडस ऑपरेंडी 

■ रिकामा प्लॉट मोक्याच्या जागी असेल व मालक तो प्लॉट विकण्यास तयार नसेल तर सरळ त्या मालकाच्या नावाने दुसराच व्यक्ती उभा करून बोगस खरेदी-विक्री केली जाते. त्यानंतर मूळ मालकाला ही बाब लक्षात आली तरीही न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो. त्यात अनेक वर्ष लागतात. त्यामुळे मूळ मालक त्रस्त होऊन मिळेल त्या रक्कमेवर तडजोड करून मोकळा होतो.■ जुनी इमारत असली की त्यातील भाडेकरूही ४0-५0 वर्ष जुने असतात. मूळ मालकाजवळ त्यांना पैसे देऊन इमारत रिकामी करून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळे बहुतांश वेळा मूळ मालक अशी इमारत भाडेकरू असतानाच अशा रॅकेटला विकून टाकतो. ते भाडेकरूंना आमिष दाखवून जागा खाली करून घेतात. जे भाडेकरून आमिषाला बळी पडत नाहीत, त्यांना त्रास देणे सुरू होते. कधी त्या कुटुंबातील महिला, मुलींच्या मागे गुंड पाठवून घाबरविण्याचे प्रकार केले जातात. तर कधी इमारतीत जिन्याच्या आजूबाजूला २४ तास गुंड बसविले जातात. तेथेच त्यांचे दारू पिणे, पत्ते खेळण्याचे उद्योग चालतात. जिन्याचे नुकसान करून खिळखिळा केला जातो. या त्रासाला कंटाळून अखेर उर्वरित भाडेकरूही जागा खाली करून देतात. ■ तर एखादी मोक्याच्या जागेवरील मालमत्ता आवडली परंतु मूळ मालक ती विकायला तयार नसला तर त्याच्या जवळच्या व्यक्तींना हाताशी धरून आमिष दाखविले जाते. तरीही न ऐकल्यास जागा मालक कोणत्या गोष्टीला घाबरतो? कमकुवत बाजू कोणती? याची माहिती काढून त्यानुसार घाबरविले जाते.