शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाटक सादर करताना अडीअडचणींवर मात करण्याची उर्मी स्पर्धेतून मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 13:12 IST

सूर : परिवर्तन संस्थेच्यावतीने ‘राज्य नाटय़ स्पर्धेने आपल्याला काय दिले?’वर परिसंवाद

ठळक मुद्देसगळ्या कलांना सोबत घ्यावेचांगला विचार देणारे नाटक सादर व्हायला हवे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22 - नाटक सादर करताना तालीमसाठी जागा नसणे, साधन नसणे, योग्य वातावरण नसणे, संहीता नसणे तसेच पैशाची जुळवाजुळव करावी लागते, अशा  अनेक अडचणी दिग्दर्शक, कलावंतांसमोर असतात. या सर्वामध्ये नाटक सादर करायची उमेद व उर्मी मात्र असते. त्यामुळेच सर्व अडीअडचणींवर मात करीतही नाटकाचे सादरीकरण करणे, नाटक होणे हेच अधिक महत्त्वाचे असून या अडचणींनी सोडवणूक प्रत्येक कलावंत कशी करतो व आधुनिक काळातही उर्मी मिळवितो, असा सूर  मंगळवारी परिवर्तन संस्थेच्यावतीने आयोजित ‘राज्य नाटय़ स्पर्धेने आपल्याला काय दिले?’ या परिसंवादामधून उमटला. नाटय़कलावंत राज्य नाटय़ स्पर्धा झाल्यानंतर एरव्ही इकडे तिकडे निघून जातात. मात्र मंगळवारी परिवर्तन संस्थेच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करून सर्वाना एकाच व्यासपीठावर आणले.  परीवर्तन संस्था यंदा राज्य नाटय़ स्पर्धेत सहभागी नसल्याने त्यांनी रंगकर्मीनी आपल्या भावना, मत व्यक्त करावे यासाठी नूतन मराठा महाविद्यालयात हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यामध्ये स्पर्धा संपली की नाटक संपते. नाटकाचे प्रयोग होत नाही, नाटकवाल्यांमध्ये त्याबद्दलची देवाणघेवाण होत नाही, दिग्दर्शकांशी अनेकदा कलावंतांचाही संवाद होत नाही. यामुळे नाटकाचे मूल्यमापन करायला अनेकदा कमी पडतो. त्यामुळे  शहरातील नाटक हे एका विशिष्ट मर्यादेपुरताच अडकते आणि ते पुढे जात नाही. यावर विचार व्हावा या उद्देशानेच हा परिसंवाद घेण्यात आल्याचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी सांगितले. व्यासपीठावर मंजुषा भिडे, प्रा.डॉ. शमा सुबोध, पियूष रावळ, चिंतामण पाटील, विनोद ढगे यांची उपस्थिती होती. मान्यवरांसह स्पर्धेतील प्रत्येक दिग्दर्शकाचा स्मृतीचिन्ह व ‘लोकमत’चा दीपोत्सव अंक देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये रमेश भोळे, अनिल कोष्टी, विशाल जाधव, किरण अडकमोल, प्रदीप भोई, आकाश बाविस्कर, चिंतामण पाटील यांचा समावेश होता. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. 

नाटकाचे विविध प्रकार, आधुनिक काळात बदलेले नाटक, रंगमंचाचा शक्यतांचा घेतलेला शोध व यातुन नविन करण्याची मिळालेली उर्मी या सर्वांचा उहापोह यामध्ये प्रत्येक कलावंतांनी केला. प्रत्येक नाटकांविषयी दिग्दर्शक, वक्ते व उपस्थित कलावंतांनी मते मांडली. 

सगळ्या कलांना सोबत घ्यावेयावेळी चिंतामण पाटील म्हणाले की नाटकात काय करावे? आणि काय करु नये हे आम्हाला नाटक पाहून कळाले.  अनेकदा संगीताची जोड नाटकाला देणे खूप कठीण असते. मात्र नाटय़कर्मीनी सगळ्यांची साथ, सगळ्या कलांना सोबत घ्यावे. नृत्य, संगीत, शिल्प अशा सगळ्या कलांमध्ये गेल्यास नाटक व कलावंत म्हणून आपण अधिक प्रगल्भ होत असतो असे नमूद केले.  मिलींद पाटील यांनी प्रेक्षकांच्या भूमिकेतून मत मांडताना सांगितले की समाजाला आपण काय देतो? यातून लेखन व्हावे. सकारात्मकतेच्या बाबींचा विचार करून त्यापद्धतीने प्रेक्षकांना चांगला विचार देणारे नाटक सादर व्हायला हवे. तर प्रविण पांडे यांनी राज्य नाटय़ाला आपण काय द्यायला हवे याचाही विचार हवा. कलावंत म्हणून नाटय़ स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासाठी आपण काय करतो आहे याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.