शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या खर्चाची जुळवा-जुळव सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:19 IST

निवडणूक खर्च निरीक्षकांकडून तपशीलाची तपासणी

जळगाव : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवडणूक खर्च निरीक्षकांनी शनिवारी मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या हिशोब नोंदवह्या तपासल्या. यात निरीक्षण नोंद वही व उमेदवारांकडील नोंदवही यांच्यात या पूर्वीही तफावत आल्याने त्यांची बारकाईने तपासणी सुरू असून प्रमुख राजकीय पक्षांच्या खर्चाची जुळवा-जुळव सुरूच असल्याची माहिती मिळाली. यात रविवारीदेखील आकडेमोड सुरूच राहणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी सकाळपासून जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक वेणूधर गोडेसी आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक मधुकर आनंद यांच्या उपस्थितीत दोन्ही मतदार संघात निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांच्या खर्चाच्या हिशोब नोंदवहीची (शॅडो रजिस्टर) तिसरी तपासणी सुरु करण्यात आली.यावेळी निवडणूक खर्च नियंत्रण व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित, खर्च निरिक्षकांचे संपर्क अधिकारी तुषार चिनावलकर, डी. बी. बेहरे, विनोद चावरीया, लेखाधिकारी देशमुख, पी. पी. महाजन, पी. पी. सोनवणे, विलास पाटील, कपिल पवार यांच्यासह निवडणूक खर्च शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी निवडणूक खर्च निरीक्षकांनी मतदारसंघहनिहाय उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून आतापर्यंतच्या खर्चाच्या हिशोब नोंदवह्या, बँकेचे पासबुक, रोखीने करण्यात आलेला दैनंदिन आर्थिक व्यवहार, खर्चाचा ताळमेळ करताना दाखविण्यात आलेली बिले, इत्यादींची तपासणी केली. त्याचबरोबर निवडणूक खर्च शाखेकडे सादर केलेल्या बिलांचा ताळमेळ, जाहिरात प्रमाणीकरण समितीने सादर केलेले खर्चाचे विवरण उमेदवारांनी त्यांच्या खर्चात दाखविले किंवा नाही याचीही पडताळणी केली. ‘पेडन्यूज’बाबतचीही माहिती जाणून घेतली.मागील दोन तपासणीच्यावेळी ज्या उमेदवारांच्या हिशोब नोंदवहीमध्ये तफावत आढळून आली, त्यांना देण्यात आलेल्या नोटीसीवर त्याचा खुलासा इत्यादींची तपासणी करण्यात आली.निवडणुकीनंतर निवडणूक लढविणाºया उमेदवारांच्या अंतिम खर्चाची तपासणी करण्यात येणार असून त्याबाबत संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल, असे केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव