शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आशाबाबा नगरातून दोन लाखाचा ऐवज लांबवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:46 IST

 आशाबाबा नगरातील मिनाक्षी सजन भालेराव यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाखाचे दागिने व ३० हजार रुपये रोख असा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हे दागिने व रोख रक्कम मिनाक्षी भालेराव यांचे भाऊ व वहिणीचे होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबंद घर फोडले बहिणीकडे ठेवलेले भाऊ व वहिणीचे दागिने लंपास मेहुण्याकडे गेल्या अन् चोरी झाली

 

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि.१८  आशाबाबा नगरातील मिनाक्षी सजन भालेराव यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाखाचे दागिने व ३० हजार रुपये रोख असा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हे दागिने व रोख रक्कम मिनाक्षी भालेराव यांचे भाऊ व वहिणीचे होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशाबाबा नगरात मिनाक्षी भालेराव या मुलगा अभिलाष याच्यासह राहतात. भाऊ दीपक निकम हे बदलापूर येथे नोकरीला आहे. गेल्या महिन्यात दीपक कुटुंबियांसह मिनाक्षी यांच्याकडे आले होते. दिवाळीत पुन्हा येणार असल्याने त्यांनी पत्नीचे दीड लाखाचे दागिने व स्वत:चे ३० हजार रुपये रोख बहिणीकडेच ठेवले होते. ८  सप्टेंबर रोजी अभिलाष हा दीपक यांच्यासोबत मुंबई येथे गेला होता. त्यामुळे मिनाक्षी या एकट्याच घरी होत्या.

 मेहुण्याकडे गेल्या अन् चोरी झालीदरम्यान, मिनाक्षी यांचे मेहुणे प्रकाश धुरंदर हे जिल्हा कारागृहात नोकरीला आहे. १४ ते १६ सप्टेंबरपर्यंत त्या दोन दिवसांसाठी मेव्हुणे धुरंदर यांच्याकडेच मुक्कामाला होत्या. त्याच काळात घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरातील ऐवज लांबविला.१६ सप्टेंबर रोजी हा प्रकार लक्षात आला. ही माहिती मिनाक्षी यांनी लागलीच बहिण व मेहुण्यांना सांगितली. दागिन्यांच्या पावत्या नसल्याने पोलिसांनी दोन दिवस गुन्हा दाखल केला नाही. सोमवारी पावत्या सादर केल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

असा गेला मुद्देमाल ५२ हजार ५०० रुपये किंमतीचे ३५ ग्रॅमच्या पाटल्या, ३० हजार रुपये किंमतीचे २० ग्रॅमचे ब्रेसलेट, ५२ हजार ५०० रुपयांच्या दोन साखळी व दोन पदक, १५  हजार रुपये किंमतीच्या १० ग्रॅमची अंगठी  तर ३०  हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचे ठसे घेण्यात आले.