शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कापड खरेदीसाठी उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 11:58 IST

बाजार गजबजला : घागरा, कुर्ती, पायजमाला वाढली मागणी

ठळक मुद्देवेगवेगळी पसंतीनावीण्यपूर्ण वस्त्रश्रृंखलानवरात्रोत्सवात खरेदीचा लाभ

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - सण उत्सावाचे पर्व सुरू होताच कापड बाजाराने उसळी घेतली असून विविध प्रकारचे कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होवू लागली आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या पाश्र्वभूमीवर घागरा, कुर्ती पायजामा अशा प्रकारच्या कपडय़ांना मोठी मागणी आहे. या सोबतच साडय़ा खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे तर तरुणाईकडून जीन्स, टी शर्ट यांना जास्त मागणी असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. दोन दिवसांपासून तर खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गुरुवारी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीची स्थापना, पूजा-अर्चा झाल्यानंतर शुक्रवारपासून शहरवासीय खरेदीसाठी बाहेर पडले. शहरातील बहुतांश दुकानांमध्ये कापड खरेदीसाठी गर्दी झाल्याने अनेक ग्राहक दुकानांमध्ये प्रतीक्षा करीत थांबले होते. 

सणउत्सवांचे दिवस असल्याने कापड दुकानांमध्ये नावीण्यपूर्ण वस्त्रांचा स्टॉक प्रमाणात उपलब्ध करून दिलेला आहे. यामुळे ग्राहकांना कपडे निवडीस मोठा वाव आहे. दुकान मालकांनी रेडिमेड मेन्सवेअर वस्त्रश्रृंखला, सुटिंग्ज अॅण्ड शटिर्ंग तसेच साडय़ा व ड्रेसमटेरियल्स नवीन स्टॉकमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. नवरात्रोत्सवात ग्राहक अधिकाधिक खरेदीचा लाभ घेताना बाजारपेठेत दिसून येत आहे. सध्या कपडय़ांमध्ये घागरा, कुर्ती, पायजामा यांना नवरात्र उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पसंती आहे.  या सोबतच टी-शर्ट, जीन्स, ज्ॉकेट यांना मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले. नवनवीन साडय़ा उपलब्ध झाल्याने त्यांच्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी वाढली आहे. विविध प्रकारच्या कपडय़ांना पसंती असून ग्राहकांच्या आवडीनुसार कपडे उपलब्ध करून दिलेले आहे.                             -विजय गोविंदाणी,  कापड व्यावसायिक, एस-3 सुरेश शुटिंग्ज अॅण्ड सारीज्.