शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव येथे दर्शनाला गेलेल्या जळगावात माजी सैनिकाकडे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 21:37 IST

कुटुंबासह शेगाव येथे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेले माजी सैनिक अरुण हिरामण वाघ (वय ३८ रा. भास्कर हौसिंग सोसायटी, शिवकॉलनी, जळगाव) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५१ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे शिव कॉलनीतील घटना  ५१ हजाराचे दागिने लांबविलेदरवाजाचे कुलुप आढळले जिन्यात

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ :  कुटुंबासह शेगाव येथे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेले माजी सैनिक अरुण हिरामण वाघ (वय ३८ रा. भास्कर हौसिंग सोसायटी, शिवकॉलनी, जळगाव) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५१ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अरुण वाघ हे माजी सैनिक असून सध्या एका खासगी संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत आहेत. १० फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता पत्नी शोभना, आई लिलाबाई, मुलगा प्रथम,मुलगी भाग्यश्री असे शेगाव येथे गेले. तेथे गजानन महाराजांचे दर्शन आटोपून हे कुटुंब ११ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घरी परतले असता घराचे कुलुप जिन्यात आढळून आले तर दरवाजा अर्धवट उघडा होता.घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता. घरातील तिन्ही लोखंडी कपाट उघडे होते तर बेडरुममधील कपाटही उघडे होते.

असा गेला मुद्देमाल१८ हजार रुपये किमतीची १० ग्रॅमची सोनसाखळी, ७ हजार २०० रुपये किमतीचे ४ ग्रॅमचे कानातील सोन्याचे टॉप्स, ९ हजार किमतीचे ५ ग्रॅमचे कानातील दुसरे टॉप्स, ३ हजार ६०० रुपये किमतीची सोन्याची चिप्स, १२ हजार ६०० रुपये किमतीच्या सोन्याच्या २ अंगठ्या व ६ हजार ६०० रुपये किमतीची चांदीची लक्ष्मीची प्रतिमा असा एकुण ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. याप्रकरणी अरुण वाघ यांनी सोमवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार गोपाळ चौधरी करीत आहेत.