शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग उभारणीने मिळेल रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : जिल्ह्यातील ८० टक्के कापूस प्रक्रिया उद्योग नसल्याने बाहेर जातो. जिल्ह्यातच टेक्सटाईल व वस्त्रोद्योग उभारल्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : जिल्ह्यातील ८० टक्के कापूस प्रक्रिया उद्योग नसल्याने बाहेर जातो. जिल्ह्यातच टेक्सटाईल व वस्त्रोद्योग उभारल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी रविवारी येथे झालेल्या नोकरी मेळाव्यात केले.

राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाकडून बोहरा सेंट्रल शाळेत झालेल्या नोकरी मेळाव्याचे उद‌्घाटन गुजराथी यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर होते. गुजराथी यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटिलिजन्स धोकादायक आहे. त्याच्याकडे डोके आहे, पण हृदय नाही. आमच्या युवकांजवळ बुध्दिमत्ता व हृदय दोन्ही आहे. संजय गरुड यांच्या कल्पकतेतून होत असलेल्या मेळाव्यातून रोजगाराच्या संधी आपल्यापर्यंत पोहचत आहे.

देवकर यांनी सांगितले की, नोकरी मिळणे अवघड झाल्याने शिक्षण घेऊनही युवक बेरोजगार होत आहे. नोकरी मिळवून देणे महत्त्वाचे काम असून हा उपक्रम चांगला आहे. सुरुवातीला संजय गरुड यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख किशोर पाटील यांनी स्वागत केले. सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, किशोर पाटील, प्रदीप लोढा, भगवान पाटील, सरोजिनी गरुड, ज्ञानेश्वर बोरसे, पप्पू पाटील, विलास राजपूत, अनिल बोहरा, डी. के. पाटील, प्रल्हाद बोरसे, संदीप हिवाळे, किशोर खोडपे, माधव चव्हाण उपस्थित होते. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.