शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात गणरायाची जल्लोषात स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 13:56 IST

मिरवणुकांमध्ये जल्लोष

ठळक मुद्देपारंपरिक वाद्यांना लाभली पसंतीपेढे व मिठाईची मागणी दुप्पटबाजारपेठेत संचारले नवचैतन्य 

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 25 - ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष अशा चैतन्य व मंगलमय वातावरणात जळगावात शुक्रवारी लाडक्या गणरायाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनामुळे भक्तांच्या चेह:यावर अपूर्व उत्साह आहे. सकाळपासूनच शहरात मिरवणुका सुरू झाल्या .  पवित्र मंत्रोच्चारात विधीवत पूजा-अर्चा केल्यानंतर गणरायाची स्थापना करण्यात आली.

ढोल-ताशांचा दणदणाटगणरायाच्या मिरवणुकीत ढोल व ताशांचा प्रचंड दणदणाट केला जात होता. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते ढोल-ताशांच्या तालावर थिरकत होते. जस-जसा ढोल व ताशांचा गजर वाढत होता; तस-तसा कार्यकत्र्याचा उत्साह व आनंद द्विगुणित होत होता. मिरवणुकांमध्ये अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला. बाप्पाच्या आगमनामुळे बालगोपाळांमध्येही आनंदाचे वातावरण होते. मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या काहींनी कपाळाला तर काहींनी हाताच्या मनगटाला भगव्या रंगाच्या ‘गणपती बाप्पा मोरया’ लिहिलेल्या पट्टय़ा बांधल्या होत्या. घरात प्रतिष्ठापनेसाठी गणेशमूर्तीची खरेदी केल्यानंतर लगेच तेथूनच बाप्पाची सवाद्य मिरवणूक काढली जात होती. तर मोठय़ा सार्वजनिक गणेश मंडळांनी टप्प्याटप्प्याने मिरवणुका काढल्या.गेल्या महिनाभरापासून गणेशभक्तांना लागलेली गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ अखेर शुक्रवारी पूर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर घराघरात तसेच लहान-मोठय़ा सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली. गणरायाच्या मिरवणुकीत यंदा लहान व मोठय़ा सार्वजनिक गणेश मंडळांकडून डॉल्बी, ब्रास बॅँड व डीजे अशा कर्णकर्कश व जीवघेण्या वाजंत्रीऐवजी ढोल-ताशे, झांज अशा पारंपरिक वाद्यांना पसंती देण्यात आली होती. पारंपरिक वाद्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. गणरायाच्या आगमनामुळे  बाजारपेठेत नवचैतन्य संचारले होते. गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, पेढे व मिठाई खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी बाजारपेठेत झाली होती. ङोंडू व गुलाबाची फुले, केळीची पाने व खांब, श्रीफळ, विडयाच्या पानांच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद होता. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल झाली.

गणपतीच्या प्रतिष्ठापनेनंतर प्रसादासाठी पेढे व मिठाई लागते. त्यामुळे  24 ऑगस्टपासूनच पेढे व मिठाई व माव्याच्या मोदकांच्या मागणीत दुपटीने वाढ झाली.  सकाळपासून स्वीट मार्टच्या दुकानांवर पेढे व मिठाई खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. गावराणी तुप व बुंदीच्या लाडूंनाही विशेष मागणी होती, असे विक्रेत्यांनी सांगितले.