तसेच महेश प्रगती मंडळाचे सचिव आनंद पलोड यांनी रेडक्रॉस सोसायटीत प्लाझ्मादान केले. यानिमित्त त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी प्लाझ्मादान, रक्तदान, प्लेटलेट्स दान करणाऱ्या पत्रकार अय्याज मोहसीन यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, माहेश्वरी सभेचे तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा, प्रोजेक्ट चेअरमन नचिकेत जाखेटिया, अमित बेहडे, बाळकृष्ण लाठी, महेश प्रगती मंडळाचे सदस्य आशिष बिर्ला, राजेश राठी, दीपक फापट उपस्थित होते.
इन्फो :
मुलीच्या निर्णयाचा अभिमान :
प्लाझ्मादान करणारे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित होते. कोरोनावर मात केल्यानंतर शगुन मंडोरा हिने प्लाझ्मादानाबाबत माहिती घेतली. त्यानंतर प्लाझ्मादान करण्याची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. मुलीचा दातृ्त्वभाव लक्षात घेऊन वडील पवन मंडोरा यांनीही माहेश्वरी सभेच्या माध्यमातून प्लाझ्मादान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पिता-पुत्रीने एकाच वेळेस प्लाझ्मादान केले. दरम्यान, यावेळी मुलीच्या या निर्णयाचा आपल्याला अभिमान असल्याचे मत पवन मंडोरा यांनी व्यक्त केले.