शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता मृत्यू प्रकरण : 10 युनिटची अतिरिक्त जबाबदारी

By admin | Updated: January 8, 2017 00:53 IST

थकबाकी वसुलीसाठी वीज कंपनीचा होता आटापिटा

जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सावदा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आकाश रामचंद्र पाटील (वय 38, रा़ रायसोनी नगर, मूळ रा.विवरे, ता.रावेर) यांच्यावर 10 युनिटची अतिरिक्त जबाबदारी होती, आणि याच कामाच्या ताणामुळे शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला              होता. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीतील विविध संघटनांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.कठोर कारवाईची मागणीसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिका:यांवर कठोर कारवाईसाठी संघटनांतर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरू आह़े सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने या आंदोलनाला पाठिंबा दिला आह़े 5 रोजी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होत़े 6 जानेवारीपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू आह़े या आंदोलनात आकाश पाटील यांचाही सहभाग होता़ वरिष्ठांच्या त्रासामुळे तसेच कामाच्या ताणतणावातून आत्महत्या केलेल्या उपकार्यकारी अभियंत्याच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी असता दुस:या उपकार्यकारी अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो, हा दुर्दैवी योगायोगाच म्हणावा लागेल़महावितरणकडून चार पत्रेमृत्युमुखी पडलेले आकाश पाटील यांचे मोठे भाऊ प्रशांत पाटील यांनी सांगितले की, आकाश  हे उपकार्यकारी अभियंता होत़े मात्र सहायक अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने 10 युनिटची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर होती़ महावितरणची थकबाकी वसुलीची मोहीम सुरू आह़े त्यांच्यावर वरिष्ठांचा वसुलीसाठी दबाव होता़ वसुलीसाठी त्यांना महावितरणकडून चार पत्र देण्यात आले होते. अतिरिक्त कामामुळे त्याच्यावरील ताण वाढला़ त्यामुळेच त्यांना एवढय़ा कमी वयात हृदयविकाराचा झटका आला असल्याचेही सबऑर्डिनेट असोसिएशनचे सहसचिव कुंदन भंगाळे यांनी सांगितल़े