शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वनवास संपता संपेना

By admin | Updated: January 16, 2017 00:29 IST

जलकुंभ ठरतोय शोपीस : चाळीसगावातील मालेगावरोड परिसरातील व्यथा

चाळीसगाव : भर  उन्हाळ्यात शहरात  सर्वच भागात मुबलक पाणी मिळत होते. आमचा घसा मात्र कोरडाच राहिला. यंदा पावसाची आबादानी असली तरी पाण्यासाठी आमची पायपीट थांबलेली नाही. सध्या पाणी मिळतेही पण ‘नैवेद्याला फिरवावे तसे.’ वर्षभरापासून जलकुंभ आहे, पण शोपीस म्हणून. आमचा हा वनवास संपणार कधी? हा कोरडाठाक प्रश्न आहे, मालेगाव रोड स्थित हजारो नागरिकांचा. तथापि  पालिका प्रशासन ढिम्म आहे.चाळीसगाव शहरात 75 कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. यामुळे गत उन्हाळ्यात इतरत्र सगळीकडे दुर्भीक्ष्य असताना शहरवासीयांना पाण्याचे ‘अच्छे दिन’ होते. या योजनेअंतर्गत नव्या विस्तारलेल्या नागरी वस्त्यांसाठी जलकुंभही उभारले गेले. रेल्वे मार्गाच्या पलीकडे किमान 20 हजारांहून अधिक असणा:या लोकसंख्येसाठी मालेगाव रोडस्थित राखुंडेनगरात जलकुंभ उभारण्यात आला. मात्र तो कार्यान्वित न झाल्याने या परिसरातील नागरिकांची पायपीट थांबलेली नाही. पालिकेत सत्ता परिवर्तन झाले असून आतातरी आमचा प्रश्न सुटला पाहिजे, अशी संतप्त मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तीन कि.मी.वरून होतो पाणीपुरवठाशहरात पाणीपुरवठय़ाचे एकूण 72 झोन आहेत. यापैकी 22 हून अधिक झोन हे डेराबर्डी  भागातील जलकुंभाला जोडले आहेत. मालेगाव रोड परिसरात याच जलकुंभावरुन पाणीपुरवठा होतो.  येथून हा जलकुंभ तीन-चार कि.मी. लांब असल्याने पाण्याचा अपव्यय होऊन पाणी समस्या उग्र झाली आहे. काही भागात अंतर्गत जलवाहिन्या नसल्याने नागरिकांचे हाल होतात.प्रशासनाचे दुर्लक्ष10 लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ नव्याने या भागात उभारला गेला आहे. गेल्या फेब्रुवारीत जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून अंतर्गत जलवाहिन्याचे काम शिल्लक आहे. विशेष म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यावर जलवाहिनेचे काम तातडीने होणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष  असल्यानेच सुसज्ज  जलकुंभ  शोपीस झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत वेळोवेळी पालिकेकडे गा:हाणे मांडूनही उपयोग झाला नाही, अशी तक्रार नागरिक मांडतात.                  (वार्ताहर)4 फेब्रुवारीतच मालेगाव रोडवरील जलकुंभाचे काम झाले पूर्ण 4जलकुंभ कार्यान्वित झाल्यास सुरळीत होईल पाणीपुरवठा. आमदारांनी लक्ष घालण्याचीही होतेयं मागणी.4अंतर्गत जलवाहिन्याअभावी नवा जलकुंभ कुचकामी420 हजारांहून अधिक लोकसंख्येची गंभीर समस्या4सद्य:स्थितीत 3 कि.मी.वरुन होतो  पाणीपुरवठा 4डेराबर्डीच्या जलकुंभावर 22 झोनचा भार. पाण्याचाही होतो अपव्यय4पालिका प्रशासन दिरंगाई करीत असल्याचा नागरिकांचा रोष4नगराध्यक्षांचाही रहिवास याच भागात,  अंतर्गत जलवाहिनी कामाची प्रतीक्षा संपणार कधी ?पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अंतर्गत जलवाहिनीचे काम पूर्ण केले जाईल. लवकरच जलकुंभाचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.- आशालता विश्वास चव्हाण, नगराध्यक्षामालेगाव रोड परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. जलकुंभ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नगराध्यक्षा व मुख्याधिका:यांसमोर हा प्रश्न मांडला असून लवकरच अंतर्गत पाईप लाईनचे काम करण्यात येईल. -विजया पवार/घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक