शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

ममुराबाद नाका भागातील अतिक्रमणे अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून जळगाव शहरातील शनी मंदिराकडे जाणारा रस्ता अतिक्रमणांमुळे अरुंद झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून जळगाव शहरातील शनी मंदिराकडे जाणारा रस्ता अतिक्रमणांमुळे अरुंद झाला आहे. महापालिकेने संबंधितांना त्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुदतसुद्धा दिली होती. प्रत्यक्षात बरेच दिवस उलटूनही काहीच कारवाई झालेली नाही. त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून शनी मंदिराकडे जाताना चौघुले प्लाॅटसमोर असलेला ममुराबाद जकात नाका वाढत्या अतिक्रमणांमुळे आता दिसेनासा झाला आहे. नाक्याची जुनी खोली जेमतेम तग धरून उभी असली तरी आजूबाजूला वाढलेल्या पक्क्या घरांची अतिक्रमणे पाहिल्यानंतर नाका अतिक्रमणात आहे की, महापालिकेच्या जागेत अशी शंका उपस्थित होत आहे. नाका महापालिकेच्या जागेत असेल त्याच्या परिसरात असलेली सर्व घरे नियमित कशी काय झाली आणि अतिक्रमित घरांकडे इतके दिवस महापालिकेने लक्षच दिले नसेल का, असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत. अशीच स्थिती पुढे मायक्का देवी मंदिर परिसरात झाली आहे. अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी खूपच कमी झाल्यामुळे या ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्याकडे महापालिका अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाले असून, वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांमध्ये वाद होण्याच्या घटनादेखील घडू लागल्या आहेत. महापालिका प्रशासनाने अतिक्रमणांकडे वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.