शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

छत्र हरपलेल्या कुटुंबीयांसाठी रोजगारनिर्मितीची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 21:08 IST

विद्यार्थ्यांना शिक्षणात मदतीचा हात । पद व प्रसिद्धी न करता सरस्वती मिशनची व्रतस्थ समाजसेवा

पाचोरा : प्रसिद्धीसाठी वाटेल ते करणा?्या आणि प्रत्येक क्षणी धडपडणाऱ्या सामान्य माणसांच्या या युगात प्रसिद्धीपासून स्वत:ला चार हात दूर ठेवत विंदा करंदीकरांच्या ‘देणाºयाने देत जावे घेणाºयाने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाºयाचे हात घ्यावे..’ या काव्यपंक्ती सार्थ ठरवत कुटुंब प्रमुखांच्या अकस्मात निधनाने पोरक्या झालेल्या कुटुंबाला मदतीचा हात दोणारी संस्था येथे अस्तित्वात आहे.दातृत्वाचा यथार्थ धडा देणारी सरस्वती मिशन बहुउद्देशीय ही संस्था समाजासमोर एक आदर्श निर्माण करीत आहे. संस्थेच्या कुठलेही पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो न देता समाजातील गरजवंतांसाठी मदतीचा हात देणारी ही संस्था एक आदर्श निर्माण करीत आहे. हेच धोरण या संस्थेला इतरांपासून वेगळे ठरवते.येथील सुतारकाम करणारे प्रवीण सुरेश पवार - बडगुजर यांची किडणी निकामी झाल्यामुळे ते अंथरुणाला खिळून होते. त्यांचे अलिकडेच निधन झाले. ऐन तारुण्याच्या व उमेदीच्या काळात कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्याने कुटुंबावर अस्मानी संकट कोसळले. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा व लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. कुटुंबात दोन मुले लहान असून मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. अचानक झालेल्या घटनेमुळे त्यांच्यावर मोठे संकट आले. खामगाव येथील गणेश भेरडे यांनी मिशन प्रतिनिधींशी संपर्क करून मदतीबाबत चर्चा केली. यानंतर लगेच मिशन प्रतिनिधींनी या कुटुंबाला हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला. स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यांना पिको - फॉल शिलाई मशिन व इलेक्ट्रिक मोटर असा पूर्ण संच त्यांच्या घरी जाऊन सुपूर्द केला.या कुटुंबातील गृहिणीला सरस्वती मिशनने स्वयंरोजगारासाठी मदतीचा हात देऊन पुन्हा एक आदर्श निर्माण केला. एवढेच नव्हे तर या कुटुंबातील दोन मुलांच्या शिक्षणासाठी मिशन टीम आपल्या परीने प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांना धीर दिला.

समाजोन्नतीचा ध्याससमाज उन्नतीच्या ध्यासाने सरस्वती मिशनने एकता आणि प्रबोधन हे ब्रीद उराशी बाळगले आहे. पद, प्रतिष्ठा व नावाशिवाय प्रामाणिक राहून अव्याहतपणे समाजसेवा करीत आहे. गेल्या दशकापासून संपूर्ण महाराष्ट्रभर या संस्थेचे कार्य सुरू आहे. ही संस्था गरजवंतांना आपत्कालीन मदत तसेच शैक्षणिक क्षेत्रात गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देते.