शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावरील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:46 IST

जळगाव : जळगाव विमानतळावरील तांत्रिक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून, खबरदारी म्हणून विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांची ...

जळगाव : जळगाव विमानतळावरील तांत्रिक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून, खबरदारी म्हणून विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांची शुक्रवारी जिल्हा आरोग्य विभागाने कोरोनाच्या चाचण्या केल्या. चाचणी केलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल दोन दिवसांनी येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. विमानाने बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्किनिंग करण्यात येत आहे. चार दिवसांपासून दोन कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची जिल्हा रुग्णालयातर्फे कोरोना चाचणी करण्यात आली होती. शुक्रवारी एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

इन्फो :

खबरदारी म्हणून इतर कर्मचाऱ्यांचीही चाचणी

विमानतळ प्रशासनाने शुक्रवारी विमानतळावरील अन्य कर्मचाऱ्यांच्याही जिल्हा आरोग्य विभागामार्फत कोरोना चाचण्या केल्या. जिल्हा आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री सोनार, वैद्यकीय अधिकारी डॉ. परमानंद पाटील, आरोग्य सेवक पकंज तायडे, संतोष पावरा आदी कर्मचाऱ्यांनी विमानत‌ळावर जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली. या कर्मचाऱ्यांचा अहवाल आता दोन दिवसांनी प्राप्त होणार आहे.