शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बात्सरला एल्गार... बाटली आडवी झालीच पाहिजे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:37 IST

पती,मुले व्यसनाधीन : स्वातंत्र्यदिनी दारुबंदीसाठी महिला धडकल्या ग्रा.पं.वर

खेडगाव, ता. भडगाव : बात्सर येथे कधी नव्हे ती हिंमत ५० च्यावर महिलांनी दाखवित स्वातंत्र्य दिनानिमीत्त ग्रा.पं. समोर सुरु असलेल्या कार्यक्रम स्थळी जावुन गावात दारुबंदी झालीच पाहीजे, हा आग्रह धरला. यावेळी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकुन घेत तसा महिला ग्रामसभेचा ठराव करण्यात आला.यानुसार भडगाव येथे जावुन पोलीस अधिकारी यांना याविषयी ज्ञात करुन गावी दारुबंदीसाठी विशेष मोहीम राबाविण्याची मागणी करण्यात येणार आहे.मागील काही दिवसात बात्सर येथे दारुचा सुळसुळाट झाला आहे. दारुच्या आहारी आदिवासी, शेतमजुर वर्ग यांच्या घरातील कर्ता पुरुष तर गेलेच आहेत पण त्यांची लहान मुले देखील हेच अनुकरण करीत व्यसनाच्या वाटेवर आहेत. यामुळे घरातील महिलांची चिंता वाढली आहे.दिवसभर शेतात शेतमजुरी करीत शिणलेल्या माहिला संध्याकाळ पासुन दारुडा नवºयाच्या होणाºया जाचास , भानगडीस वैतागल्या आहेत. याशिवाय दारुमुळे व्यसनी झालेल्यांना अनेक व्याधी जडत ते मृत्युच्या दारात असल्याचे या महिला सांगतात. शेतमजुरीतुन उपजिवीका करावी की व्यसनाधीन झालेल्यांना खर्च करावा या कात्रीत महीला सापडल्या आहेत.यामुळेच या महिलांनी स्वातंत्र्य दिनी ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांसमोर आपली वरील कैफियत मांडत याविरोधात लढा देण्याचा निर्धार केला आहे.पिचर्डे येथेही फुंकले रणशिंगबात्सरडे जवळलीच पिचर्डे येथे देखील शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने गावात दारुबंदीसाठी रणशिंग फुकले आहे. बात्सर, पिचर्डे ही गावे एकमेकास लागुन आहेत. यामुळे महिलांच्या दारुबंदी चळवळीस बळ मीळत आहे. दोन्ही गावातुन शिंदीच्या धर्तीवर बाटली आडवी करण्याच्या निर्धाराने महिलांनी पदर खोचला आहे. स्वातंत्र्य दिनी दारुपासुन मुक्तीसाठीचा हा लढा कुणाच्या सांगण्यावरुन नव्हे तर उस्फुर्त असा आहे हे येथे विशेष होय.