शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मार्च 2018 अखेर सातपुडय़ातील सर्व गावांचे विद्युतीकरण - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 13:20 IST

गरज वाटल्यास मध्यप्रदेशातून वीज विकत घेतली जाईल

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 17 - मार्च 2018 अखेर सातपुडय़ातील सर्वच महसूल गाव व पाडय़ांचे विद्युतीकरण करण्यात येणार असून गरज  वाटल्यास  मध्यप्रदेशातून वीज विकत घेतली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलगी येथे आयोजित आढावा बैठकीत केले.‘मॉडेल गाव’ भगदरी येथे विविध विकास कामांची पहाणी केल्यानंतर मोलगी येथे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत विविध विकासाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. सातपुडय़ातील विद्युतीकरण आणि आरोग्याच्या प्रश्नावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक गाव व पाडे विद्युतीकरणापासून दूर आहे. भौगोलिक अडचणी असल्या तरी प्रत्येक गाव पाडय़ाच्या घरार्पयत वीज पोहचविण्याचा प्रय} आहे. त्यासाठी मध्यप्रदेशातून वीज विकत घेण्याचीही तयारी आहे. त्यामुळे मार्च 2018 अखेर सातपुडय़ातील सर्व गाव व पाडय़ांचे विद्युतीकरण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी भागात शासकीय अधिकारी, कर्मचा:यांचे 350 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिका:यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी घोषीत केले. आदिवासी शेतक:यांच्या जमिनीच्या सिंचन प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आदिवासी शेतक:यांना शेततळ्यातून सौर पंपाद्वारे सिंचनासाठी विशेष योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. त्यासाठी मागेल त्याला शेततळे दिले जाणार आहे.दुर्गम भागात कर्मचारी, अधिकारी राहत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे दुर्गम भागात मध्यवर्ती ठिकाणी अधिकारी, कर्मचा:यांना राहण्यासाठी चांगल्या दर्जाची निवासस्थाने बांधून देण्याचा पॅटर्न राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी घोषीत केले.यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार उदेसिंग पाडवी, आयुक्त महेश झगडे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी , जिल्हा परिषद सीईओ जी.सी.मंगळे, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान, मुख्यमंत्री नियोजित दौ:याच्या अर्धातास अगोदर अर्थात 9.45 वाजता मोलगी येथे पोहचले. मोलगीहूनही ते अर्धातास अगोदर अर्थात 12.45 वाजता शिंदखेडय़ाकडे रवाना झाले.